गोरेगाव येथील घटना: फिल्म सिटीत सेटची भिंत कोसळली; दोघा कामगारांचा मृत्यू, एक जखमी

तिसऱ्या जखमीवर बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
गोरेगाव येथील घटना: फिल्म सिटीत सेटची भिंत कोसळली; दोघा कामगारांचा मृत्यू, एक जखमी

मुंबई : गोरेगाव पूर्व आरे कॉलनी रोड फिल्म सिटी गेट नंबर २ येथील २० फूट उंच ६० मीटर लांब भिंत शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता कोसळली. या घटनेत तीन जण जखमी झाले असून दोन कामगार शंतू मंडल ( ३२) व जावेद बिश्वास (४५) या दोघांचा मृत्यू झाला असून तिसऱ्या जखमीवर बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

गोरेगाव पूर्व, आरे कॉलनी रोड, फिल्म सिटी गेट नंबर २, प्राईम फाॅक्स प्रोडक्शन येथील ६० फूट लांब व २० फूट उंच भिंत बांधण्याचे काम सुरू असताना शनिवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले असून दोघांचा मृत्यू झाला, तर तिसऱ्या जखमीवर ट्राॅमा केअर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे गोरेगाव पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, ढिगारा उपसण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in