मुंबई : एकनाथ आव्हाड यांच्या पुस्तकांचा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश सुप्रसिद्ध बालसाहित्यिक, कथाकथनकार एकनाथ आव्हाड यांचा साहित्य अकादमी पुरस्कार विजेता 'छंद देई आनंद' या बालकवितासंग्रहाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात तसेच आव्हाड यांचा 'आनंदाची बाग' या बालकथासंग्रहाचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात एम. ए. च्या अभ्यासक्रमासाठी या वर्षापासून समाविष्ट करण्यात आला आहे.
एकनाथ आव्हाड यांची आतापर्यंत तीस पुस्तके प्रसिद्ध झालेली असून, त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे वा. गो. मायदेव आणि बालकवी पुरस्कार लाभलेले आहेत. तसेच त्यांच्या पुस्तकांचे हिंदी, इंग्रजी आणि ब्रेल लिपीत अनुवाद झालेले असून, त्यांच्या बालसाहित्याचा समावेश बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातही करण्यात आलेला आहे.