पालिका शाळांतील असाधारण चित्रांचा कॅलेंडरमध्ये समावेश
मुंबई : हरित ऊर्जेचा पुरस्कार करण्यासाठी अदानी इलेक्ट्रिसिटी आणि अदानी फाऊंडेशनने आपल्या ‘उत्थान’ या सीएसआर प्रकल्पांतर्गत पालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी अलीकडेच ‘हरित ऊर्जा चित्रकला स्पर्धे’चे आयोजन केले होते, ज्यात १९२ विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी भाग घेतला. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी काढलेल्या १९२ चित्रांपैकी १२ असाधारण चित्रांचा समावेश अदानी इलेक्ट्रिसिटीने खास तयार केलेल्या २०२४ च्या कॅलेंडरमध्ये करण्यात आला आहे.
अदानी इलेक्ट्रिसिटी, अदानी फाउंडेशनच्या सहयोगाने, ‘उत्थान’ प्रकल्पाअंतर्गत मुंबईभरातील महापालिकेच्या शाळांतील १२०० विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण पुरविते. उत्थान प्रकल्पाचा एक भाग म्हणून ‘हरित ऊर्जे’विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी दोन महिन्यांच्या एका विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थी, शिक्षण आणि पालकांनी ‘हरित ऊर्जा’ या विषयावरील चित्रकला स्पर्धेत भाग घेतला. इलेक्ट्रिसिटीने एक खास २०२४ कॅलेंडर तयार केले आहे, ज्यात विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी बनविलेल्या १९२ चित्रांमधल्या १२ असाधारण चित्रांचा समावेश आहे.
२०२४ कॅलेंडरसाठी ज्या विद्यार्थी, शिक्षक व पालकांची चित्रे निवडली गेली आहे, त्यांनी हरित ऊर्जेविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या कामी दिलेल्या योगदानासाठी अदानी इलेक्ट्रिसिटी कार्यालयांमध्ये कौतुक करण्यात आले. हरित ऊर्जा आणि पृथ्वीच्या संरक्षणाचा संदेश ठळकपणे देणारी विविध कल्पक चित्रे विद्यार्थ्यांनी काढली. काही विद्यार्थ्यांनी पर्यावरण वाचविण्यासाठी आणि जबाबदार नागरिक म्हणून हरित ऊर्जेचा पुरस्कार करणाऱ्या सवयी अंगिकारण्यासाठी कशाप्रकारे पाऊले उचलता येतील, याविषयी आपली मते आणि कल्पनाही मांडल्या.