पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरावर आयकरचा छापा

रमेश दुबे हे महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि उत्तर प्रदेशचे माजी खासदार आहेत.
पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरावर आयकरचा छापा

मुंबई : एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरावर गुरुवारी आयकर विभागाने छापा टाकला. करचुकवेगिरीप्रकरणी प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीतील निवासस्थानाची आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी झडती घेतली. प्रदीप शर्मा यांना याआधी मनसुख हिरेन हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. २५ फेब्रुवारी २०२१ रोजी जिलेटिनने भरलेली एक चारचाकी मुकेश अंबानी यांच्या अँटिलियाजवळ सापडली होती, तर ५ मार्च रोजी या चारचाकीचा मालक मनसुख हिरेन ठाण्याच्या खाडीत मृतावस्थेत आढळला. या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलिसांकडून एनआयएकडे देण्यात आला. तपासाअंती जून २०२१ मध्ये प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेचाही हात असल्याचे समोर आले होते. शर्मा यांच्या घरावर छापा टाकण्याबरोबरच आयकर अधिकाऱ्यांनी माजी खासदार रमेश दुबे आणि त्यांच्या बांधकाम व्यावसायिक मुलाच्या निवासस्थानाचीही झडती घेतली. रमेश दुबे हे महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि उत्तर प्रदेशचे माजी खासदार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in