एचडीएफसी बँकेकडून कर्जावरील व्याजदरात वाढ; बँकेने ५-१० बेसिस पॉइंट्सने केली वाढ

सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेने रेपो लिंक्ड लेंडिंग रेट ५० बेसिस पॉइंट्सने वाढवून ८.३० टक्के केला आहे.
 एचडीएफसी बँकेकडून कर्जावरील व्याजदरात वाढ; बँकेने ५-१० बेसिस पॉइंट्सने केली वाढ

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये तिसऱ्यांदा वाढ केल्यानंतर आता सर्वच बँका आपले कर्जाचे व्याजदर वाढवत आहे. आयसीआयसीआय बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँक यांच्यापाठोपाठ आता देशातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसी बँकेने सर्व प्रकारच्या कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बँकेने ५-१० बेसिस पॉइंट्सने ही वाढ केली आहे. एचडीएफसी बँकेने सर्व कर्जासाठीचा एमसीएलआर ५-१० बेसिस पॉइंट्सने वाढवला आहे. ही वाढ आजपासून म्हणजेच ८ऑगस्टपासून तात्काळ लागू झाली आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेने रेपो लिंक्ड लेंडिंग रेट ५० बेसिस पॉइंट्सने वाढवून ८.३० टक्के केला आहे. नवे दर रविवार, ७ ऑगस्टपासून लागू झाले आहेत. आयसीआयसीआय बँकेने बाह्य बेंचमार्क कर्ज दर (IEBLR) वाढविला आहे आणि तो रेपो दरानुसार केला आहे. बँकेने IBLR ९.१० टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. नवे दर ५ ऑगस्टपासून लागू झाले आहेत.

याशिवाय, सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने एक्सटर्नल बेंचमार्क, रेपो लिंक्ड लेंडिंग रेट ७.९ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. त्यांनी रेपो लिंक्ड लेंडिंग रेट .५० टक्क्यानी वाढवून ७.९० टक्के केला आहे. नवीन दर सोमवार, ८ ऑगस्टपासून लागू होणार असल्याची माहिती पीएनबीने दिली आह

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in