मुंबई : निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदारांना सहभागी होता यावे, यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे (एमएमएमओसीएल) २० नोव्हेंबर रोजी म्हणजेच मतदानाच्या दिवशी मेट्रो सेवेची वेळ वाढविण्यात आली आहे. २० नोव्हेंबर रोजी पहिली मेट्रो पहाटे ४ वाजता गुंदवली, दहिसर (पूर्व) आणि अंधेरी (पश्चिम) स्थानकांवरून सुटेल. तर शेवटची मेट्रो २० नोव्हेंबरच्या मध्यरात्री म्हणजे २१ नोव्हेंबर रोजी १ वाजता सुटेल.
विशेष वाढीव वेळा :
सकाळच्या सेवा : ०४:०० वाजता - ०५:२२ वाजता
रात्री उशिराच्या सेवा : रात्री ११ वाजता - मध्यरात्री १ वाजता
या वाढीव वेळेत मेट्रो दर २० मिनिटांनी उपलब्ध असेल
विस्तारित कामकाज :
एकूण १९ अतिरिक्त फेऱ्या नियोजित करण्यात आल्या आहेत.
यामुळे एकूण दैनिक फेऱ्या २४३ वरून २६२ फेऱ्यांपर्यंत वाढतील.
नियमित सेवा ०५:२२ वाजता ते २३:०० वाजता दरम्यान सुरू राहतील.