कोरोनामुळे मुंबईतील गरोदर मातांच्या मृत्यू संख्येत वाढ

कोरोनाविषयी त्यांच्यात जागरूकता निर्माण करणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
कोरोनामुळे मुंबईतील गरोदर मातांच्या मृत्यू संख्येत वाढ

मुंबईत कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या गरोदर मातांच्या संख्येत २०२० सालच्या तुलनेत २०२१मध्ये वाढ झाल्याचे उघडकीस आले आहे. कोरोनामुळे २०२०मध्ये १९७ पैकी २९ गरोदर मातांना (१४.७ टक्के) आपला जीव गमवावा लागला होता, तर २०२१मध्ये १९०पैकी ४३ (२२.६३ टक्के) गरोदर मातांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गरोदर मातांमध्ये कोरोनाची लागण होण्याची शक्यता जास्त असल्याने कोरोनाविषयी त्यांच्यात जागरूकता निर्माण करणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी मिळवलेल्या माहितीनुसार, २०२१मध्ये रक्तस्राव (२१ मृत्यू), सेप्सिस (२२ मृत्यू), टीबी (१६), हृदयविकार (९), अॅनेमिया (६), उच्च रक्तस्राव (३ मृत्यू) यामुळे मातांचा मृत्यू झाला आहे. रक्तस्रावामुळे २०१९मध्ये ३८ तर २०२०मध्ये १८ मातांना आपला जीव गमवावा लागला आहे. “गेल्या तीन वर्षांत ७१ मातांचे मृत्यू रक्तस्रावामुळे झाले आहेत. नियमित चाचण्या केल्या नाहीत, तर महिलांना शरीरातील िमोग्लोबिनवर नियंत्रण राखता येत नाही, त्यामुळेच मृत्यूंचे प्रमाण वाढत चालले आहे. प्रसूतीदरम्यान खूप रक्तस्राव होत असेल तर वेळेत पुरेशा प्रमाणात रक्त उपलब्ध असल्यास गर्भवतीचे प्राण रक्त संक्रमणाने वाचवता येतात. रक्ताच्या कमतरतेचा मुद्दा प्रकाशात आणायला हवा,” असे एका वरिष्ठ डॉक्टरने सांगितले. “कोरोनामुळे गर्भवती महिलांच्या शरीरात गुंतागुंत होऊ शकते. कोरोना संसर्ग झाल्यास गर्भवती महिलांची फुप्फुसे आणि अन्य अवयवांवरही त्याचा किंचितसा परिणाम होतो. गर्भधारणेदरम्यान स्त्रियांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, ज्यामुळे त्यांना संसर्ग होण्याची अधिक शक्यता असते. अनेकांना प्रसूतीच्या वेळी कोविडची लागण झाल्याचे कळते,” असे पालिका रुग्णालयातील एका वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरने सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in