आरबीआयने सावध करुनही असुरक्षित कर्जपुरवठ्यात वाढ

काही अहवालानुसार भारतीय रिझर्व्ह बॅंक अशा प्रकारच्या कर्जांवरील जोखीमेचा भार वाढवण्याची शक्यता आहे.
आरबीआयने सावध करुनही असुरक्षित कर्जपुरवठ्यात वाढ

मुंबर्इ: वैयक्तिक कर्जे आणि क्रेडीट कार्ड वरील कर्जे यासारखी असुरक्षित कर्जे देणे ही मोठी जोखीम असते असे आरबीआयने बजावले असले तरी देखील अशा कर्जपुरवठ्यात वाढ होर्इल असा अंदाज अॅक्सिस कॅपिटल रीसर्च या ब्रोकरेज संस्थेने व्यक्त केला आहे. आरबीआयने अशा प्रकारची कर्जे देणाऱ्यांना अवाजवी जोखीम वाढणार नाही याची काळजी घेण्याची सूचना केली आहे.

काही अहवालानुसार भारतीय रिझर्व्ह बॅंक अशा प्रकारच्या कर्जांवरील जोखीमेचा भार वाढवण्याची शक्यता आहे. यामुळे कर्जदात्यांच्या कर्ज वितरण क्षमतेला मर्यादा पडतात, परिणामी भांडवलावरील खर्च वाढतो. जोखीम अधिक असूनही विकास उच्च दरावर राखता येतो असेही या अहवालात निश्चित करण्यात आले आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये असुरक्षित वैयक्तीक कर्जावरील जोखीम १२५ टक्के होती जी सरकारने कमी करुीन १०० टक्क्यांवर आणली होती. आरबीआयने पुन्हा ही जोखीम १२५ टक्क्यांपर्यंत वाढवली तर सर्व बॅकांच्या भांडवलावर ०.४० टक्याचा धक्का बसणार आहे. बॅंका आणि बॅंकेतर संस्था वैयक्तीक कर्जासारख्या असुरक्षित कर्जांचे वाटप करीत असतात. त्यात काही प्रमाणात बॅंकेतर वित्तीय सेवा कंपन्यांचा म्हणजे एनबीएफसी यांचा देखील हात असतो. मात्र बॅंकेतर कंपन्या कर्ज वितरणासाठी तंत्रज्ञानावर अवलंबून असतात, असेही अॅक्सिस कॅपिटल रीसर्चच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in