स्वाइन फ्लूनंतर मूत्रमार्गाच्या संसर्गात वाढ; आठवड्यात ८ ते ९ प्रकरणे

त्रासांकडे दुर्लक्ष केल्यास संसर्ग वाढत जाऊन आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे
स्वाइन फ्लूनंतर मूत्रमार्गाच्या संसर्गात वाढ; आठवड्यात ८ ते ९ प्रकरणे

स्वाइन फ्लूनंतर मुंबई शहरातील डॉक्टरांना गेल्या काही दिवसांपासून मूत्रमार्गाच्या संसर्गाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. आठवड्यातून ८ ते ९ मूत्रमार्गात संसर्गाची प्रकरणे हॉस्पिटलमध्ये नोंद केली जात आहेत. याबाबत डॉक्टरांना विचारले असता त्यांनी सांगितले की, मूत्रमार्गात संसर्गाच्या प्रकरणांमध्ये हंगामी वाढ झाली असून आणि दररोज एक किंवा दोन रुग्ण येत आहेत. विशेषत: ज्यांना अनियंत्रित मधुमेहाचा त्रास होता किंवा कोविड उपचारादरम्यान स्टिरॉइड्स घेतले होते, त्यांना मूत्रमार्गाचा संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे. जर याकडे दुर्लक्ष केले गेले, तर त्यामुळे मूत्रपिंडाची जळजळ होऊ शकते किंवा दाह होऊ शकतो, या त्रासांकडे दुर्लक्ष केल्यास संसर्ग वाढत जाऊन आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे, असेदेखील त्यांनी म्हटले आहे.

शरीरातील पाण्याची कमतरता यामुळे मूत्रमार्गाचा जंतुसंसर्ग होण्याचे प्रमाण अधिक असते. मूत्राशय सतत भरल्यासारखे वाटणे, सतत लघवीला होणे, मूत्रोत्सर्जन करताना वेदना होणे, दाह होणे, लघवीचा रंग गडद असणे, लघवीमध्ये रक्ताचे प्रमाण असणे, लघवीचा उग्र वास येणे, महिलांच्या ओटीपोटात दुखणे, अशा प्रकारची लक्षणे मूत्रमार्गाचा संसर्गामध्ये दिसून येतात. हे त्रास जाणवू लागल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास निदान होऊन योग्य उपचार घेतल्याने तो कमी होऊ शकतो; परंतु या त्रासांकडे दुर्लक्ष केल्यास संसर्ग वाढत जाऊन आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होतात.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in