योजनांमध्ये लोकांचा सहभाग वाढवावा; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून केंद्राच्या योजनांचा आढावा

राज्यातील सर्व योजनांच्या लाभार्थींना वैयक्तिकरीत्या मुख्यमंत्र्यांचे पत्र पाठवा, असेही निर्देश यावेळी देण्यात आले.
योजनांमध्ये लोकांचा सहभाग वाढवावा; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून केंद्राच्या योजनांचा आढावा

नव्या सरकारकडून पंतप्रधानांनीसुद्धा मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. विशेषत: केंद्र आणि राज्य भागीदारीच्या योजना अगदी शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकार म्हणून नागरिकांपर्यंत पोहोचा, आपली कार्यक्षमता वाढवताना एकमेकांमध्ये समन्वय ठेवावा. तसेच योजनांमध्ये लोकांचाही सहभाग वाढवावा, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली. राज्यातील सर्व योजनांच्या लाभार्थींना वैयक्तिकरीत्या मुख्यमंत्र्यांचे पत्र पाठवा, असेही निर्देश यावेळी देण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात राबवण्यात येणाऱ्या केंद्राच्या योजना किती प्रमाणात लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या आहेत, याचा विस्तृत आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधानांच्या भेटीस गेलो असता त्यांनी केंद्र राज्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे आपली जबाबदारी वाढली असून अंमलबजावणीत कोणत्याही स्वरूपाच्या अडचणी आल्या तरी आपण त्या दूर करू या. नवनवीन उपक्रमांचे स्वागत आहे. केंद्राचा जास्तीत जास्त निधी कसा मिळेल, हे पाहून तत्काळ असे प्रस्ताव सादर करावेत. शासन आणि प्रशासन ही राज्यकारभाराच्या रथाची दोन चाके आहेत. दोघांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. लोकाभिमुख योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in