एलआयसीच्या एम्बेडेड व्हॅल्यूत झाली वाढ,संचालक मंडळाची अहवालाला मंजुरी

एलआयसीचा एम्बेडेड व्हॅल्यूचा अहवाल मे. मिलीमन ॲडव्हायझर एलएलपीने तयार केला आहे
 एलआयसीच्या एम्बेडेड व्हॅल्यूत झाली वाढ,संचालक मंडळाची अहवालाला मंजुरी

भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीच्या एम्बेडेड व्हॅल्यूत वाढ झाली आहे. ३१ मार्च २०२२ रोजी एलआयसीची एम्बेडेड व्हॅल्यू ५,४१,४९२ कोटी ठरवण्यात आली आहे. तर सप्टेंबर २०२१ रोजी हीच एलआयसी एम्बेडेड व्हॅल्यू ५,३९,६८६ कोटी होती. सप्टेंबर २०२१ च्या तुलनेत ३१ मार्च २०२२ मध्ये एम्बेडेड व्हॅल्यूत वाढ झाली आहे. तर ३१ मार्च २०२१ मध्ये ही व्हॅल्यू ९५,६०५ कोटी होती.

एलआयसीच्या संचालक मंडळाने ३१ मार्च २०२२ च्या एम्बेडेड व्हॅल्यूच्या अहवालाला मंजुरी दिली आहे. एलआयसीचा एम्बेडेड व्हॅल्यूचा अहवाल मे. मिलीमन ॲडव्हायझर एलएलपीने तयार केला आहे. एलआयसीच्या कलम २४ कलमानुसार ८ जानेवारी २०२२ रोजी संचालक मंडळाची बैठक झाली. यात एका निधीचे दोन निधीमध्ये विभागणी करण्याचे ठरवले. या निधीची विभागणी ३१ मार्च २०२२ रोजीच्या आर्थिक अहवालात दाखवण्यात आली आहे. एलआयसीच्या नवीन व्यवसायाचे मूल्य ३१ मार्च २०२२ रोजी ७६१९ कोटी रुपये आहे. तर ३१ मार्च २०२१ एलआयसीच्या नवीन व्यवसायाचे मूल्य ४१६७ कोटी होते. तर ३० सप्टेंबर २०२१ रोजी संपलेल्या सहामाहीत नवीन व्यवसायाचे मूल्य १५८३ कोटी होते.

एलआयसीचा वार्षिक समतुल्य प्रीमियम ३१ मार्च २०२२ रोजी ५०,३९० कोटी होता. तर ३१ मार्च २०२१ रोजी हाच प्रीमियम ४५५८८ कोटी होता. एम्बेडेड व्हॅल्यूचा परतावा २१ मार्च २०२२ रोजी ३६. 9 टक्के होता. तर मार्च २०२१ रोजी तो ११. 9 टक्के होता. एका निधीचे दोन निधीत विभागणी केली. या निधी विभागणीची नोंद २०२१-२२मध्ये घेण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in