गणेशोत्सवात मेट्रोच्या वाढीव फेऱ्या; अंधेरी आणि गुंदवलीवरून शेवटची मेट्रो रात्री ११ ऐवजी ११.३० वाजता

गणेशोत्सवादरम्यान भक्तांच्या सोयीसाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमएमओसीएल) मार्फत मेट्रोच्या वाढीव फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.
गणेशोत्सवात मेट्रोच्या वाढीव फेऱ्या; अंधेरी आणि गुंदवलीवरून शेवटची मेट्रो  रात्री ११ ऐवजी ११.३० वाजता
(संग्रहित छायाचित्र)
Published on

मुंबई : गणेशोत्सवादरम्यान भक्तांच्या सोयीसाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमएमओसीएल) मार्फत मेट्रोच्या वाढीव फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आणि महामुंबई मेट्रोचे अध्यक्ष डॉ. संजय मुखर्जी यांनी ही घोषणा केली. उत्सवाच्या काळातील वाढीव फेऱ्या चालविण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली होती.

गणेशोत्सवादरम्यान रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होते. हे लक्षात घेता ११ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर, २०२४ या कालावधीत अंधेरी (पश्चिम) आणि गुंदवली या दोन्ही टर्मिनल्सवरून शेवटची मेट्रो ट्रेन रात्री ११ ऐवजी रात्री ११.३० वाजता सुटेल.

अंधेरी (पश्चिम) आणि गुंदवली टर्मिनल्सवरून शेवटच्या ट्रेनची वेळ ३० मिनिटांनी वाढवण्यात येणार आहे. दोन्ही टर्मिनल्सवरून अतिरिक्त मेट्रो ट्रेन रात्री ११.१५ आणि ११.३० वाजता सुटतील. गुंदवली ते दहिसर (पूर्व) आणि अंधेरी (पश्चिम) ते दहिसर (पूर्व) या स्थानकांदरम्यान चार वाढीव फेऱ्या सुरू केल्या जातील. या विस्तारामुळे प्रमुख स्थानकांवर एकूण २० अतिरिक्त फेऱ्या चालवल्या जातील.

गणेशोत्सवात मेट्रोच्या वाढीव फेऱ्या; अंधेरी आणि गुंदवलीवरून शेवटची मेट्रो  रात्री ११ ऐवजी ११.३० वाजता
नवशक्ति-FPJ इको गणेश: पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा आणि जिंका मोठी बक्षिसे

वाढीव फेऱ्यांचा तपशील

गुंदवली ते अंधेरी (पश्चिम) :

रात्री १०:२०, १०:३९, १०:५० आणि ११ वाजता (४ सेवा)

अंधेरी (पश्चिम) ते गुंदवली :

रात्री १०:२०, १०:४०, १०:५० आणि ११ वाजता ( ४ सेवा)

गुंदवली ते दहिसर (पूर्व):

रात्री ११:१५ आणि ११:३० वाजता (२ सेवा)

अंधेरी पश्चिम ते दहिसर (पूर्व):

रात्री ११:१५ आणि ११:३० वाजता (२ सेवा)

दहिसर (पूर्व) ते अंधेरी पश्चिम:

रात्री १०:५३, ११:१२, ११:२२ आणि ११:३३ वाजता (४ सेवा)

दहिसर (पूर्व) ते गुंदवली:

रात्री १०:५७, ११:१७, ११:२७ आणि ११:३६ वाजता (४ सेवा)

logo
marathi.freepressjournal.in