पावसाळी आजारांचा धोका गंभीर, लेरिया, डेंग्यू आणि गॅस्ट्रोचे वाढते रुग्ण

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीचे आजार पसरण्याचा धोका वाढला आहे.
पावसाळी आजारांचा धोका गंभीर, लेरिया, डेंग्यू आणि गॅस्ट्रोचे वाढते रुग्ण
Published on

मलेरिया, लेप्टो, डेंग्यू, गॅस्ट्रो, कावीळ आदी पावसाळी आजारांनी डोकेवर काढले आहे. जुलै २०२१ या महिन्यात साथीच्या आजारांचा झपाट्याने प्रसार झाला होता. जुलै महिन्याच्या पहिल्या तीन दिवसांत मलेरिया, डेंग्यू आणि गॅस्ट्रोचे तब्बल ८६ रुग्ण आढळले असून सांताक्रुझ, विक्रोळी परिसरात डेंग्यूचा फैलाव झपाट्याने होत आहे. त्यामुळे मुंबईकरांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीचे आजार पसरण्याचा धोका वाढला आहे. सांताक्रुझ, रे रोड परिसरात डेंग्यूच्या रुग्ण संख्येत वाढ होत असून मलेरिया, गॅस्ट्रो, कावीळ या आजारांनी डोकेवर काढले आहे. जून महिन्यात डेंग्यूच्या ३९ रुग्णांची नोंद झाली होती. तर १ ते ३ जुलै या तीन दिवसांत ७ रुग्ण डेंग्यूचे आढळले आहेत. १ ते ३ जुलै या तीन दिवसांत मलेरिया ३९, गॅस्ट्रो - ४०, डेंग्यू - ७ व कावीळचे ६ रुग्ण वाढल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in