साथीच्या आजारांचा धोका वाढला; स्वाईन फ्लू, मलेरिया, लेप्टो, डेंग्यूच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा झपाट्याने प्रसार होत आहे. दर आठवड्याला रुग्णसंख्येत दुपटीने वाढ होत आहे.
साथीच्या आजारांचा धोका वाढला; स्वाईन फ्लू, मलेरिया, लेप्टो, डेंग्यूच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ

कोरोनाबाधित रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होत असताना, आता साथीच्या आजारांचाही धोका वाढला आहे. साथीच्या आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून स्वाईन फ्लू आणि डेंग्यूमुळे प्रत्येकी दोन, तर लेप्टो आणि मलेरियामुळे प्रत्येकी एक अशा एकूण सहा रुग्णांचा साथीच्या आजाराने बळी घेतला आहे. त्यामुळे मुंबईला साथीच्या आजारांचा विळखा बसला आहे. स्वाईन फ्लू, मलेरिया, लेप्टो, डेंग्यूच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ होत आहे. १ ते २१ ऑगस्टपर्यंत स्वाईन फ्लूचे १६३, मलेरिया - ५०९, डेंग्यू - १०५ तर लेप्टोचे - ४६ रुग्ण आढळले आहेत.

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा झपाट्याने प्रसार होत आहे. दर आठवड्याला रुग्णसंख्येत दुपटीने वाढ होत आहे. १४ ते २१ ऑगस्ट या एका आठवड्यातच स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत २५ ने वाढ झाली असून , मलेरियाच्या रुग्णसंख्येत ९०ने वाढ झाल्याने मुंबईकरांसह आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे.

खार येथील ३४ वर्षीय व्यक्तीस त्रास होत असल्याने उपचारासाठी दाखल केले होते. तपासणीत लेप्टोची लागण झाल्याचे निदान झाले होते. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. ग्रॅटरोड येथे राहणारे ५५ वर्षीय २३ जुलै रोजी ताप, उलटी, जुलाब होत असल्याने उपचारासाठी दाखल झाले होते. त्यांची रक्त तपासणी केली असता मलेरिया झाल्याचे निदान झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

कांदिवली येथे राहणाऱ्या आठ वर्षीय मुलीला उलटी, ताप येत असल्याने रुग्णालयात दाखल केले होते. तर तर खार येथील ३८ वर्षीय व्यक्तीला त्रास होत असल्याने उपचारासाठी दाखल केले होते. दोघांच्या रक्त तपासणी अहवालात दोघांना डेंग्यूची लागण झाल्याचे निदान झाले; मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला.

स्वाईन फ्लूने घेतला दोघांचा जीव

अंधेरी पूर्व येथील ४४ वर्षीय व्यक्तीला खोकला झाला कफ झाला होता. त्यांची रक्त तपासणी केली असता स्वाईन फ्ल्यूचे निदान झाले. तर मरिन लाईन्स येथे राहणाऱ्या ४२ वर्षीय व्यक्तीला ताप व उलटीचा त्रास होत असल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची रक्त तपासणी केली असता स्वाईन फ्लू झाल्याचे निदान झाले. यूएसए व काश्मीर येथे प्रवास करून ९ जुलै रोजी मुंबईत परतले आणि त्याच दिवशी रुग्णालयात दाखल झाले होते; मात्र उपचारादरम्यान ११ जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in