IND vs NZ:भारत-न्यूझीलंड सेमीफायनलदरम्यान वानखेवर घडेल मोठी घटना ; मुंबई पोलिसांना ट्विटरवर आली धमकी

न्यूझीलंडच्या खात्यात आतापर्यत नऊपैकी पाच सामन्यांमध्ये विजय आणि चार सामन्यांमध्ये पराभव अशी कामगिरी आहे
IND vs NZ:भारत-न्यूझीलंड सेमीफायनलदरम्यान वानखेवर घडेल मोठी घटना ; मुंबई पोलिसांना  ट्विटरवर आली  धमकी
Published on

आज मुंबईतील वानखेडेवर सेमीफायनलचा सामना रंगणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड संघ असा सामना होईल. विश्वचषकाच्या साखळीत धर्मशालामध्ये जो सामना झाला त्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडला चार विकेट्सनी हरवलं होत. न्यूझीलंडच्या खात्यात आतापर्यत नऊपैकी पाच सामन्यांमध्ये विजय आणि चार सामन्यांमध्ये पराभव अशी कामगिरी आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता हा संघ वानखेडेच्या मैदानात आमनेसामने येत आहेत.

या सामन्यादरम्यान काही मोठ्या घटना घडतील, अशी धमकी एका अज्ञात व्यक्तीनं ट्विटरच्या माध्यमातून मुंबई पोलिसांना दिली आहे. या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आता मुंबई पोलिसांनी वानखेडे स्टेडियम आणि परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. आज वानखेडेवरच्या टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड या सामन्यात मोठ्या घटना घडणार असल्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीनं ट्विटरवर मुंबई पोलिसांना बंदूक, हँडग्रेनेड आणि गोळ्यांच्या फोटोमध्ये टॅग केलं आहे. याशिवाय सामन्यादरम्यान आम्ही आग लावू, असा मेसेज देणारा फोटोही धमकीच्या मेसेजसोबत पोस्ट करण्यात आला होता.

या गोष्टीचं गांभीर्य लक्ष्यात घेऊन मुंबई पोलिसांनी सर्व परिसरात बॅरिकेटिंग केली असून वानखेडे स्टेडियमच्या आत जाणाऱ्या सर्व गेटच्या रोडवर झिरो पार्किंग करण्यात येणार आहे. आज मोठ्या प्रमाणात प्रेक्षक मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर येत असल्यानं मुंबई पोलीस गेल्या दोन दिवसांपासून याची तयारी करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in