म्हाडा मुख्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा

म्हाडातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
म्हाडा मुख्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा

मुंबई : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७६व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी पोलीस पथकाने व म्हाडातील सुरक्षारक्षकांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली.

यावेळी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी अरुण डोंगरे, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, म्हाडाचे मुख्य अभियंता-२ सुनील जाधव, मुख्य अभियंता-३ शिवकुमार आडे, कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी मारोती मोरे, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे मुख्य अधिकारी रवींद्र पाटील, ‘म्हाडा’चे सचिव राजकुमार सागर, सहमुख्य अधिकारी उमेश वाघ, उपमुख्य अभियंता अनिल अंकलगी, उपमुख्य अभियंता किशोरकुमार काटवटे, उपमुख्य अभियंता संतोष बोबडे, मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले, दक्षता व सुरक्षा अधिकारी संजय शिंदे आदींसह म्हाडातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांच्या हस्ते ‘म्हाडा’चे अंतर्गत गृहपत्र ‘परिसर परिचय’चे अनावरण करण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in