भारत, अमेरिकेचे एआय नियमांवर सहकार्य अत्यावश्यक, सत्या नाडेला यांचे प्रतिपादन

कृत्रिम बुद्धिमत्ता नियम आणि इतर नियमांवर भारत आणि अमेरिका यांच्यात अधिक सहकार्य असायला हवे, असे प्रतिपादन मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नाडेला यांनी बुधवारी केले.
भारत, अमेरिकेचे एआय नियमांवर सहकार्य अत्यावश्यक, सत्या नाडेला यांचे प्रतिपादन

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता नियम आणि इतर नियमांवर भारत आणि अमेरिका यांच्यात अधिक सहकार्य असायला हवे, असे प्रतिपादन मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नाडेला यांनी बुधवारी केले.

भारतात जन्मलेले आणि जागतिक तंत्रज्ञान कंपनी मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की, उभय देशात अशी भागीदारी आर्थिक वाढीचे समान लाभ मिळण्यास मदत करू शकते. एआय हे एक शक्तिशाली नवीन तंत्रज्ञान आहे, ज्याला जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात वेगाने वापरली जाणार आहे, असे नाडेला यांनी कंपनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांगितले.

दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले नाडेला म्हणाले, “ निकष काय आहेत, काय नियम आहेत यापेक्षा मला वाटते की विशेषत: भारत आणि युनायटेड स्टेट्स यांनी सहकार्य करण्यास सक्षम असणे अत्यावश्यक आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील एआय बाबतच्या सहकार्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. मायक्रोसॉफ्ट २०२५ पर्यंत भारतातील २० लाख लोकांना एआय कौशल्याच्या संधी उपलब्ध करून देईल, अशी घोषणाही त्यांनी केली. नाडेला म्हणाले की, एआय हे देशातील जीडीपी वाढीस चालना देण्यास मदत करू शकते आणि भारत ही सर्वाधिक वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक असल्याचे त्यांनी संबोधले.

logo
marathi.freepressjournal.in