
आज भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टरसोबत एक अपघात घडला. नौदलाचे ध्रुव हेलिकॉप्टर हे नियमित उड्डाण करत असताना मुंबईच्या किनाऱ्यावर कोसळले. यामध्ये हेलिकॉप्टरचे मोठे नुकसान झाले असून यातील ३ भारतीय जवानांना वाचवण्यात यश आले आहे.
अपघात घडल्यानंतर तातडीने नौदलाने शोध आणि बचाव मोहीम राबवली. तसेच, या घटनेच्या चौकशी आदेश देण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय नौदलाचे एएलएच मुंबईपासून नियमित उड्डाण करत असताना किनाऱ्याजवळ अपघात घडला. हेलिकॉप्टर कसे कोसळले? आणि अपघात कसा झाला? हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. नौदलाकडून अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.