भारतीय चलन रुपयाने गाठला नवा नीचांक

जागतिक बाजारातील नकारात्मक वातावरण आणि भारतीय शेअर बाजारात झालेल्या घसरणीचा परिणाम भारतीय चलनावर झाला.
भारतीय चलन रुपयाने गाठला नवा नीचांक

गेल्या काही दिवसांपासून रुपयाचे गडगडणे सुरु आहे. सोमवारी भारतीय चलन रुपया १५ पैशांनी गडगडला नवा नीचांक ७९.६० वर बंद झाला. जागतिक बाजारातील नकारात्मक वातावरण आणि भारतीय शेअर बाजारात झालेल्या घसरणीचा परिणाम भारतीय चलनावर झाला. रुपयाची घसरण थांबत नसल्याने अखेर भारतीय रिझर्व्ह बँकेने नवी प्रणाली तयार करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

इंटरबँक फॉरेक्स मार्केटमध्ये स्थानिक चलन ७९.५५ या कमजोरीने उघडला. दिवसभरात त्याने ७९.५३ ही किमान आणि ७९.६६ ही कमाल पातळी गाठली होती. दिवसअखेरीस तो ७९.६० वर बंद झाला. सोमवारच्या ७९.४५ तुलनेत रुपया १५ पैशांनी घसरला. सोमवारी भारतीय रुपयाने डॉलरच्या तुलनेत पुन्हा एकदा विक्रमी नीचांकी पातळी गाठली होती.

दिवसभराच्या व्यवहारात त्याने ७९.४५ ची नीचांकी पातळी गाठली होती. यापूर्वी त्याने ७९.३७ ची नीचांकी पातळी नोंदवली होती. शुक्रवारी तो ७९.२५ वर बंद झाला होता.आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरात घसरण झाल्याने रुपयाची आणखी होणारी घसरण थांबली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in