भारतीय शेअर बाजारात सहाव्या दिवशी चढता आलेख; सेन्सेक्स २१४ अंकांनी वधारला

दोलायमान सत्रात दि ३०-शेाअर बीएसई सेन्सेक्स २१४.१७ अंकांनी वधारुन ५८,३५०.५३ वर बंद झाला.
 भारतीय शेअर बाजारात सहाव्या दिवशी चढता आलेख; सेन्सेक्स २१४ अंकांनी वधारला

जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणआणि विदेशी गुंतवणूक संस्थांनी खरेदी सुरु ठेवल्याने भारतीय शेअर बाजारात सलग सहाव्या दिवशी बुधवारी चढता आलेख राहिला. माहिती तंत्रज्ञान आणि रिलायन्स इंडस्ट्रीज आदी कंपन्यांच्या समभागांची खरेदी झाल्याने सेन्सेक्स २१४ अंकांनी वधारला.

दोलायमान सत्रात दि ३०-शेाअर बीएसई सेन्सेक्स २१४.१७ अंकांनी वधारुन ५८,३५०.५३ वर बंद झाला. दिवसभरात तो ५८,४१५.६३ वर बंद झाला. तर किमान पातळी ५७,७८८.७८ झाली होती. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी ४२.७० ने वाढून १७,३८८.१५ वर बंद झाला.

सेन्सेक्सवर्गवारीत टेक महिंद्रा, टीसीएस, इन्फोसिस, टायटन, एशियन पेंटस‌्, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांमध्ये वाढ झाली. तर मारुती सुझुकी, सन फार्मा, कोटक महिंद्रा बँक, इंडस‌्इंड बँक आणि बजाज फायनान्स यांच्या समभागात घसरण झाली.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड ०.९१ टक्का घसरुन प्रति बॅरलचा भाव ९९.६३ अमेरिकन डॉलर्स झाला. तसेच विदेशी गुंतवणूक संस्थांनी मंगळवारी ८२५.१८ कोटींच्या समभागांची खरेदी केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in