भारतीय शेअर बाजारातील घसरगुंडी सुरुच,सेन्सेक्समध्ये ३७२ अंकांनी झाली घट

बुधवारी दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स ३७२.४६ अंक किंवा ०.६९ टक्का घसरुन ५३,५१४.१५ वर बंद झाला.
भारतीय शेअर बाजारातील घसरगुंडी सुरुच,सेन्सेक्समध्ये ३७२ अंकांनी झाली घट

सलग तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरण झाली. तेल कंपन्या, बँका आणि आयटी कंपन्यांच्या समभागांची विक्री झाल्याने बाजारात घट झाली. तथापि, एफएमसीजी आणि फार्मा कंपन्यांच्या समभागांची खरेदी झाल्याने बाजारातील आणखी घसरण थांबण्यास मदत झाली. गेल्या तीन सत्रात - बुधवारपर्यंत सेन्सेक्स ९६७ अंक किंवा १.७ टक्के तर निफ्टी २५४ अंकांनी घसरण झाली.

बुधवारी दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स ३७२.४६ अंक किंवा ०.६९ टक्का घसरुन ५३,५१४.१५ वर बंद झाला. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी बाजारात घसरण झाली. तत्पूर्वी, सकाळी सेन्सेक्स वधारुन उघडला आणि दिवसभरात ५४,२११.२२ ची कमाल पातळी गाठली होती. तथापि, दुपारी तो ७५० अंकांनी घसरुन ५३,४५५.२६ ही किमान पातळी गाठली होती. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी ९१.६५ किंवा ०.५७ ने घटून १६ हजारांखाली जात १५,९६६.६५ वर बंद झाला.

सेन्सेक्सवर्गवारीत इंडस‌्इंड बँक ३.४२ टक्के, भारती एअरटेल २.८७ टक्के, एचडीएफसी २.६५ टक्के, एचडीएफसी बँक २.४४ टक्के आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग १.७७ टक्के घसरला. तसेच टीसीएसचा समभाग १.४९ टक्के तर एचसीएल टेक्नॉलॉजीज १.११ टक्के आणि टायटन, आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व, टेक महिंद्रा आणि विप्रोच्या समभागात घसरण झाली.

दुसरीकडे हिंदुस्तान युनिलिव्हरचा समभाग १.९७ टक्के, एशियन पेंटस‌् १.७ टक्के आणि सन फार्माचा समभाग १.०९ टक्के आणि कोटक महिंद्रा बँक, एनटीपीसी आणि नेस्ले यांच्या समभागात वाढ झाली.

आशियाई बाजारात शांघाय, सेऊल आणि टोकियोमध्ये वधारला. तर युरोपियन बाजारात दुपारपर्यंत घसरण झाली होती. तर अमेरिकन बाजारात मंगळवारी घट झाली होती. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड १ टक्का घसरुन प्रति बॅरलचा भाव १००.५ अमेरिकन डॉलर्स झाला. तसेच विदेशी गुंतवणूक संस्थांकडून विक्रीचा मारा सुरु ठेवत मंगळवारी १,५६५.६८ कोटींच्या समभागांची विक्री केली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in