भारतीय शेअर बाजार दोलायमान राहण्याची शक्यता

विदेशी गुंतवणूक संस्थांचा खरेदीचा कल कसा आहे आणि जागतिक बाजारातील वातावरण, रुपयाला घसरण की बळ मिळणार
भारतीय शेअर बाजार दोलायमान राहण्याची शक्यता

भारतीय शेअर बाजार या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर दोलायमान राहण्याची शक्यता आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हचा व्याजदरवाढीबाबत होणारा दर, मासिक डेरिव्हेटिव्ह समाप्ती आणि कंपन्यांचे वित्तीय निकाल आदी मुद्द्यांवर शेअर बाजाराचे भवितव्य ठरेल, असे विश्लेषकांनी सांगितले.

विदेशी गुंतवणूक संस्थांचा खरेदीचा कल कसा आहे आणि जागतिक बाजारातील वातावरण, रुपयाला घसरण की बळ मिळणार, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात क्रूड तेलाचे दर आदी घटकांवर शेअर बाजारातील वातावरण ठरणार आहे, असे संतोष मीना, हेड ऑफ रिसर्च, स्वस्तिका इन्व्हेस्टमेंट लि. यांनी सांगितले.

नऊ कंपन्यांच्या बाजारमूल्यात २.९८ लाख कोटींची भर

मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी संपलेल्या आठवड्यात आघाडीच्या दहापैकी नऊ कंपन्यांच्या बाजारमूल्यात २.९८ लाख कोटींची भर पडली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टीसीएस यांना सर्वाधिक लाभ झाला. गेल्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स २३११.४५ अंक किंवा ४.२९ टक्के वधारला. आघाडीच्या दहा कंपन्यांमध्ये एलआयसी वगळता एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर लि. आणि आायसीआयसीआाय बँक यांच्या बाजारमूल्यात २,९८,५२३.०१ कोटींची वाढ झाली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in