भारतीय शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी;सेन्सेक्सची ६३० अंकांची उसळी

३०-शेअर बीएसई सेन्सेक्स ६२९.९१ अंक किंवा १.१५ टक्के वधारुन ५५,३९७.५३ वर बंद झाला.
भारतीय शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी;सेन्सेक्सची ६३० अंकांची उसळी

भारतीय शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी राहिली. जागतिक बाजारातील सकारात्मक कल आणि माहिती व तंत्रज्ञान, ऊर्जा समभागांची जोरदार खरेदी झाल्याने बाजाराला लाभ झाला. सेन्सेक्सने ६३० अंकांनी उसळी घेतली तर निफ्टीही १६,५०० अंकांचा पुन्हा टप्पा ओलांडला.

रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस आणि टाटा कन्सलटंसी सर्व्हिसेस यांच्या खरेदीमुळे आणि विदेशी गुंतवणूक संस्थांकडून झालेल्या खरेदीमुळे बाजारात सकारात्मक वातावरण राहिले.

केंद्र सरकारने बुधवारी पेट्रोल, डिझेल आणि एटीएफवरील विंडफॉल करात कपातीसंदर्भात घेतलेल्या सकारात्मक निर्णयाच्या परिणामी रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग २.४७ टक्के तर ओएनजीसीचा समभाग चार टक्के वाढला.

दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स ६२९.९१ अंक किंवा १.१५ टक्के वधारुन ५५,३९७.५३ वर बंद झाला. दिवसभरात तो ८६२.६४ अंक किंवा १.५७ टक्के वाढून ५५,६३०.२६ च्या कमाल पातळीवर गेला होता. अशा प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी १८०.३० अंक किंवा १.१० टक्के वाढून १६,५२०.८५ वर बंद झाला. सेन्सेक्सवर्गवारीत टेक महिंद्रा, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचसीएल टेक्नॉलॉजीज, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, विप्रो आणि हिंदुस्तान युनिलिव्हरच्या समभागात वाढ झाली. ब्रेंट क्रूड १.१७ टक्के घसरुन प्रति बॅरलचा भाव १०६.१ डॉलर्स झाले. विदेशी गुंतवणूक संस्थांनी मंगळवारी ९७६.४० कोटींच्या समभागांची खरेदी केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in