अमेरिकन फेडरल बैठकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात घसरण

शेअर बीएसई सेन्सेक्स २६२.९६ अंक किंवा ०.४४ टक्का घसरुन ५९,४५६.७८वर बंद झाला
अमेरिकन फेडरल बैठकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात घसरण

अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीसंदर्भात होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात बुधवारी घसरण झाली. दोन दिवसांच्या तेजीनंतर जागतिक बाजारातील संमिश्र वातावरणाचाही प्रभाव राहिला.

दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स २६२.९६ अंक किंवा ०.४४ टक्का घसरुन ५९,४५६.७८वर बंद झाला. दिवसभरात तो ४४४.३४ अंक किंवा ०.७४ टक्का घसरुन ५९,२७५.४०ही किमान घसरण झाली होती. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी ९७.९० अंक किंवा ०.५५ टक्का घसरुन १७,७१८.३५वर बंद झाला.

सेन्सेक्सवर्गवारीत इंडस‌्इंड बँकेचा समभाग सर्वाधिक ३.१९ टक्के घसरला. त्यानंतर पॉवरग्रीड, अल्ट्राटेक, सिमेंट, एल ॲण्ड टी, एनटीपीसी, एचसीएल टेक्नॉलॉजीज, डॉ. रेड्डीज, टीसीएस आणि भारती एअरटेल यांच्या समभागात मोठी घसरण झाली. उलट हिंदुस्तान युनिलिव्हर, आयटीसी, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा यांच्या समभागात वाढ झाली. विदेशी गुंतवणूक संस्थांनी मंगळवारी भारतीय शेअर बाजारात ११९६.१९ कोटींच्या समभागांची खरेदी केली.

बीएसई क्षेत्रनिहाय निर्देशांक २.३१ टक्के घसरला. वीज - २.१९ टक्के, कमोडिटीज २.०७ टक्के, कॅपिटल गुड्स‌ १.३६ टक्के आणि तेल व वायू १.३३ टक्के घसरला. मात्र, एफएमसीजी क्षेत्र १.१४ टक्के वधारला. तर आशियाई बाजारात सेऊल, टोकियो, शांघायमध्ये घसरण झाली.

रुपया घसरला २६ पैशांनी

भारतीय रुपया बुधवारी २६ पैशांनी घसरुन ८०.००वर बंद झाला. फेडरल रिझर्व्हची पॉलिसीची घोषणा होणार असल्याने त्याचा चलन बाजारावर परिणाम झाला. मंगळवारच्या सत्रात रुपया ७९.७५वर बंद झाला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in