महालक्ष्मी येथे देशातील पहिला ट्रॅव्हलेटरयुक्त पादचारी पूल; मोनोरेल, मेट्रो ३ आणि उपनगरीय रेल्वेला जोडणार; पुलाचे काम ९० टक्के पूर्ण

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) महालक्ष्मी मल्टिमॉडल कनेक्टिव्हिटी प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पाचे काम सुमारे ९० टक्के पूर्ण झाले आहे. या प्रकल्पांतर्गत देशातील पहिला ट्रॅव्हलेटरयुक्त पादचारी पूल संत गाडगे महाराज चौक मोनोरेल स्थानक, मेट्रो मार्गिका ३ आणि महालक्ष्मी उपनगरीय रेल्वे स्थानक यांना अखंड जोडणी मिळणार आहे.
महालक्ष्मी येथे देशातील पहिला ट्रॅव्हलेटरयुक्त पादचारी पूल; मोनोरेल, मेट्रो ३ आणि उपनगरीय रेल्वेला जोडणार; पुलाचे काम ९० टक्के पूर्ण
महालक्ष्मी येथे देशातील पहिला ट्रॅव्हलेटरयुक्त पादचारी पूल; मोनोरेल, मेट्रो ३ आणि उपनगरीय रेल्वेला जोडणार; पुलाचे काम ९० टक्के पूर्णछायाचित्र : सलमान अनसारी
Published on

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) महालक्ष्मी मल्टिमॉडल कनेक्टिव्हिटी प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पाचे काम सुमारे ९० टक्के पूर्ण झाले आहे. या प्रकल्पांतर्गत देशातील पहिला ट्रॅव्हलेटरयुक्त पादचारी पूल संत गाडगे महाराज चौक मोनोरेल स्थानक, मेट्रो मार्गिका ३ आणि महालक्ष्मी उपनगरीय रेल्वे स्थानक यांना अखंड जोडणी मिळणार आहे.

प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी एमएमआरडीएने मल्टिमॉडल कनेक्टिव्हिटी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पानुसार मोनोरेल स्थानक, मेट्रो मार्गिका ३ आणि महालक्ष्मी उपनगरीय रेल्वे स्थानक पादचारी पुलाच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहे. हा पूल सुमारे २८३ मीटर लांब आणि ११ मीटर रुंद आहे. त्यामुळे प्रवाशांना सुरळीत हालचाल करता येणार आहे. एकूण १७६ मीटर लांबीचे सहा ट्रॅव्हलेटर्स असून सर्वसमावेशक प्रवेशासाठी दोन प्रवासी लिफ्ट्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या माध्यमातून प्रति तास सुमारे ४ हजार ५०० प्रवासी प्रवास करू शकणार आहेत.

हा एकात्मिक इंटरचेंज मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर मोनोरेल स्थानक, मेट्रो मार्गिका ३ आणि महालक्ष्मी उपनगरीय रेल्वे स्थानकांदरम्यान प्रवासासाठी लागणारा वेळ सुमारे २० मिनिटांनी कमी होणार आहे. तसेच दक्षिण मुंबई आणि वरळी परिसरातून मुंबई मोनोरेलपर्यंत पोहोचणे देखील अधिक सोपे होणार आहेत. अखंड मल्टिमॉडल जोडणीमुळे सार्वजनिक वाहतुकीच्या वापरालाही चालना मिळणार आहे.

मुंबईतील अत्यंत दाट नागरी सुविधांच्या परिसरात हा प्रकल्प एमएमआरडीएने उभारला आहे. या प्रकल्पाच्या पायाभरणीपूर्वी १,८०० मिमी व्यासाची पावसाच्या पाण्याची वाहिनी सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आली.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in