मुंबईत भरदिवसा अंदाधुंद गोळीबार; एक जण ठार, पोलिसांकडून परिसर सील

भरदिवसा ही घटना घडल्याने मुंबईतील गँगवॉर पुन्हा डोके वर काढू लागल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
मुंबईत भरदिवसा अंदाधुंद गोळीबार; एक जण ठार, पोलिसांकडून परिसर सील

मुंबईत आज दुपारच्या सुमारास अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. चुनाभट्टी परिसरातील आझाद गल्लीत 15 ते 17 राऊंड फायर झाल्याचे सांगितले जात आहे. यात एक जण ठार झाला असून तीन ते जार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपाचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले आहेत. भरदिवसा ही घटना घडल्याने मुंबईतील गँगवॉर पुन्हा डोके वर काढू लागल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांना तात्काळ घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलिसांना घटनास्थळी बंदुकीच्या गोळ्या सापडल्या आहेत. पोलीस फेरीवाले, दुकानदार तसेच परिसरातील नागरिकांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

हा गोळीबार कोणी केला याबाबत कोणतीही माहिती समोर आली नसली तरी पूर्ववैमानस्यातून ही घटना घडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. हल्लेखोरांचे मुख्य टार्गेट काय होते, याबाबतची देखील माहिती मिळू शकली नाही. पोलीस जखमींना भेटून त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

हा गोळीबार  अचानक सुरु झाल्याने नागरिक घाबरुन गेले आणि पळापळ सुरु झाली. या परिसरातील नागरिक प्रचंड दहशतीत आहेत. पोलिसांकडून परिसर सील करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in