मुंबई पालिकेत आता इंदूर पॅटर्न! घरोघरी कचरा संकलन, व्हेईकल ट्रेकिंग सिस्टम, ड्राय वेस्ट प्लांट, रेस्टॉरंट, व्यावसायिक इमारती, विविध प्लांटची पाहणी

पालिका घनकचरा व्यवस्थापन विभागातील कनिष्ठ पर्यवेक्षक आणि अभियंता यांच्या इंदूर शहर पाहणी अभ्यास भेटीचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यास दौऱ्यात घरोघरी १०० टक्के कचरा संकलन, ओला-सुका कचरा वर्गीकरण, वाहतूक नियोजन, कचरा विल्हेवाटीचे सुयोग्य नियोजन तसेच सार्वजनिक स्वच्छता याचा अभ्यास या भेटीदरम्यान करण्यात आला.
मुंबई पालिकेत आता इंदूर पॅटर्न! घरोघरी कचरा संकलन, व्हेईकल ट्रेकिंग सिस्टम, ड्राय वेस्ट प्लांट, रेस्टॉरंट, व्यावसायिक इमारती, विविध प्लांटची पाहणी
Published on

मुंबई : घरोघरी कचरा संकलन, कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांची ट्रेकिंग सिस्टिम, ओला व सुका कचरा वर्गीकरण, व्यावसायिक ठिकाणी कचरा व्यवस्थापन या सगळ्या गोष्टींची कठोर अंमलबजावणी कशाप्रकारे केली जाते, याचा अभ्यास मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने केला. देशात स्वच्छतेचा पहिला मान मिळवणाऱ्या इंदूर महापालिकेला मिळाला आहे. मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील ५ टीममधील २५० ज्युनियर सुपरवायझर यांनी व्हिजिट करत तेथील उपाययोजनांचा अभ्यास केला.

पालिका घनकचरा व्यवस्थापन विभागातील कनिष्ठ पर्यवेक्षक आणि अभियंता यांच्या इंदूर शहर पाहणी अभ्यास भेटीचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यास दौऱ्यात घरोघरी १०० टक्के कचरा संकलन, ओला-सुका कचरा वर्गीकरण, वाहतूक नियोजन, कचरा विल्हेवाटीचे सुयोग्य नियोजन तसेच सार्वजनिक स्वच्छता याचा अभ्यास या भेटीदरम्यान करण्यात आला. महाराष्ट्र सरकारची शैक्षणिक संस्था म्हणून मान्यताप्राप्त असलेल्या अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांची अभ्यास भेटीचे आयोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी नेमणूक करण्यात आली होती.

आचारसंहिता संपल्यावर दुसरी टीम रवाना होणार!

देशात लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी व कर्मचारी निवडणूक ड्युटीला गेले आहेत. त्यामुळे इंदूर महापालिकेच्या स्वच्छतेचा अभ्यास करण्यासाठी दुसऱ्या पाच टीम मधील २५० ज्युनियर सुपरवायजर इंदूर शहराला भेट देतील, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दोनदिवसीय अभ्यास दौऱ्यात घेतले धडे

  • घरोघरी कचरा संकलन

  • सेंट्रल कंट्रोल रुम

  • व्हेईकल ट्रेकिंग सिस्टमचा अभ्यास

  • सेंट्रल लाईज प्रोसेसिंग प्लांट

  • ड्राय वेस्ट प्लांट

  • व्यावसायिक ठिकाणी कचरा व्यवस्थापन

  • सफाई कामगारांची भूमिका

  • कचरा हाताळताना सुरक्षितता

  • सामुदायिक सहभाग

  • पाच टीम मध्ये २५० ज्युनियर सुपरवायजर

logo
marathi.freepressjournal.in