दहिसर येथील इंडस्ट्रीत आग ; ८ ते ९ सिलिंडर जप्त

मुंबई अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
दहिसर येथील इंडस्ट्रीत आग ; ८ ते ९ सिलिंडर जप्त

मुंबई : गिरगाव येथील इमारतीत आग लागल्याची घटना ताजी असताना दहिसर येथील तळ अधिक एक मजली वर्धमान इंडस्ट्रीयल कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या तळ मजल्यावर शनिवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही; मात्र इंडस्ट्रीतून ८ ते ९ सिलिंडर जप्त करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

दहिसर पूर्व एस व्ही रोड येथील तळ अधिक एक मजली वर्धमान इंडस्ट्रीयल कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या तळ मजल्यावर शनिवारी रात्री आगीचा भडका उडाला; मात्र काही वेळातच आग वाऱ्यासारखी पसरली आणि लेवल दोन जाहीर करण्यात आली. मुंबई अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. दरम्यान, ७ फायर इंजिन, एक वॉटर टॅकरने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, या ठिकाणी अनधिकृत बांधकाम, पोट माळे बनवले आहे. त्यामुळे जवानांना घटनास्थळी पोहोचण्यात अडचण निर्माण झाली, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in