उद्योगपती मुकेश अंबानी मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीला

उद्योगपती गौतम अदाणी यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
उद्योगपती मुकेश अंबानी मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीला

उद्योगपती मुकेश अंबानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्‍यांच्या वर्षा या शासकीय निवासस्‍थानी भेट घेतली. शनिवारी मध्यरात्री अचानक झालेल्‍या या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मुकेश अंबानी यांच्यासोबत त्‍यांचे सुपुत्र अनंत अंबानीदेखील असल्‍याचे समजते. दोघांमध्ये साधारणतः एक तास चर्चा झाली; मात्र चर्चेचा तपशील उघड होऊ शकला नाही.

उद्योगपती गौतम अदाणी यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. उद्धव ठाकरे हे कोणत्‍याही सत्तापदावर नसतानाही अदाणी यांनी त्‍यांची भेट घेतली. मुकेश अंबानी आणि उद्धव ठाकरे यांचेदेखील घनिष्‍ठ संबंध आहेत. यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्‍यांच्या वर्षा या शासकीय निवासस्‍थानी भेट घेतली. शनिवारी मध्यरात्री अचानक झालेल्‍या या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मुकेश अंबानी यांच्यासोबत त्‍यांचे सुपुत्र अनंत अंबानीदेखील असल्‍याचे समजते. दोघांमध्ये साधारणतः एक तास चर्चा झाली; मात्र चर्चेचा तपशील उघड होऊ शकला नाही.

उद्योगपती गौतम अदाणी यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. उद्धव ठाकरे हे कोणत्‍याही सत्तापदावर नसतानाही अदाणी यांनी त्‍यांची भेट घेतली. मुकेश अंबानी आणि उद्धव ठाकरे यांचेदेखील घनिष्‍ठ संबंध आहेत. अंबानींच्या घरातील प्रत्‍येक समारंभाला ठाकरे परिवार हमखास हजेरी लावत असतो. आता याच मुकेश अंबानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मुकेश अंबानी शनिवारी मध्यरात्री १२.१५च्या सुमारास वर्षा या मुख्यमंत्री शिंदे यांच्या शासकीय निवासस्‍थानातून बाहेर पडले. याआधी त्यांची व मुख्यमंत्र्यांची सुमारे तासभर भेट झाली. अंबानी यांच्यासोबत त्‍यांचे सुपुत्र अनंत अंबानी तसेच शिंदे गटातील काही महत्त्वाचे नेतेदेखील या भेटीवेळी उपस्िथत असल्‍याचे समजते. राज्यातून वेदांतचा सेमीकंडक्टर प्रोजेक्ट गुजरातला गेल्याने राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे उद्योगजगताचा विश्वास कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in