उद्योगपती साळगांवकर कुटुंबीयांची इडीकडून चौकशी

चार हजार कोटींचा संशयास्पद परकीय चलन व्यवहार
उद्योगपती साळगांवकर कुटुंबीयांची इडीकडून चौकशी

मुंबई : गोवा येथील प्रख्यात उद्योगपती साळगांवकर कुटूंब परकीय चलन व्यवस्थापन अधिनियमा अंतर्गत तब्बल ४ हजार कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी संशयाच्या जाळ्यात सापडले आहे. या प्रकरणी इडीकडून साळगांवकर कुटुंबातील पाच सदस्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

यापूर्वी आयकर विभागाने काळा पैसा प्रकरणी ४९० कोटींच्या कर वसुलीसाठी श्रीमती लक्ष्मी अनिल साळगांवकर आणि त्यांची मुले समीर, चंदना, पूर्णिमा आणि अर्जून यांना नोटीसा बजावल्या आहेत. २०२१ पासून आयकर विभागाने साळगांवकरांना एकूण पाच नोटीसा बजावल्या असून चौकशीस हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. अन्यथा त्यांच्यावर काळा पैसा विरोधी कायद्या अंतर्गत कारवार्इ सुरू करण्यात येर्इल, असेही बजावण्यात आले आहे. कै. अनिल साळगांवकर यांच्या कुटुंबातील पाच व्यक्ती आता सिंगापूरमध्ये स्थायीक असून त्यांनी आयकर विभागाला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.

इडीने मागील महिन्यातच रिलायन्स एडीए समुहाचे अध्यक्ष अनिल अंबानी आणि त्यांच्या पत्नी टीना यांची परकीय चलन नियम उल्लंघन प्रकरणी चौकशी केली होती. त्यांची विदेशात सुमारे ८०० कोटींची संपत्ती असल्याचा पॅन्डोरा पेपर्समध्ये उल्लेख आहे. अनिल अंबानी आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्या विदेशात डझनावारी कंपन्या आहेत, असे पॅन्डोरा पेपर्समध्ये नमूद करण्यात आले आहे. या कंपन्या २००७ आणि २००८ दरम्यान स्थापन करण्यात आल्या होत्या आणि त्यांनी कर्ज देखील घेतले होते. नंतर थेट विदेशी गुंतवणूकीच्या माध्यमातून हे कर्ज भारतात आणण्यात आले होते.

पॅन्डोरा पेपर्सच्या आधारे तपास सुरू

इडीने पॅन्डोरा पेपर्सच्या आधारे या तपासाची सुरुवात केली होती, कारण या पेपर्समध्ये साळगांवकर यांच्या नावाचा उल्लेख होता. साळगांवकर बंधू विदेशात ट्रस्ट आणि कंपन्या स्थापन करीत होते. कै. अनिल साळगांवकर यांनी टॅक्स हेव्हन ब्रिटिश व्हर्जिनिया आयलॅन्डस, क्राउन ब्रार्इट ट्रेडींग लिमिटेड, जनरल हार्वेस्ट इंटरनॅशनल लिमिटेड, लिंग ताओ ट्रेडींग लिमिटेड, निकॉन एंटरप्रार्इझेस लिमिटेड, सिंग लिंग रिसोर्स लिमिटेड आणि हॉरिझॉन व्हिला इनव्हेस्टमेंट लिमिटेड अशा नावाच्या कंपन्या सुरू केल्याचे पॅन्डोरा पेपर्समध्ये नमूद आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in