देशातील महागाई आणखी वाढण्याची शक्यता नाही,एसबीआयच्या अहवालात केला दावा

एसबीआयच्या 'इकोरॅप' अहवालानुसार, 'महागाईने सर्वकालीन उच्चांक गाठलेला दिसतोय
देशातील महागाई आणखी वाढण्याची शक्यता नाही,एसबीआयच्या अहवालात केला दावा

गेल्या काही महिन्यांपासून भारतातील महागाई वेगाने वाढत आहे. असे असूनही, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) महागाई नियंत्रणात खूप पुढे असल्याचे एसबीआयच्या अहवालात म्हटले आहे. ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये आरबीआयच्या होणाऱ्या पतधोरण आढावा समितीच्या बैठकीमध्ये (एमपीसी) रेपो दर वाढवेल, असा विश्वास तज्ज्ञांना आहे. या अहवालात असेही म्हटले आहे की, महागाई आता आणखी वाढण्याची अपेक्षा नाही.

एसबीआयच्या 'इकोरॅप' अहवालानुसार, 'महागाईने सर्वकालीन उच्चांक गाठलेला दिसतोय'. एप्रिलमध्ये किरकोळ महागाई ७.७९ टक्क्यांच्या जवळपास आठ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली होती. मात्र मे मध्ये ती किंचित खाली येऊन ७.०४ टक्के झाली. अहवालानुसार, मुख्य (कोर) महागाई देखील एप्रिलमध्ये ६.९७ टक्क्यांवरून मे महिन्यात ६.०९ टक्क्यांवर आली आहे. यामध्ये २०२२-२३मध्ये सरासरी महागाई दर ६.७ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

एसबीआायच्या मुख्य आर्थिक सल्लागार सौम्या कांती घोष म्हणाल्या की आरबीआय ऑगस्टमध्ये पतधोरण आढाव्यात रेपो दर वाढवू शकते. त्यामुळे जूनमध्ये महागाई दर ७ टक्क्यांच्या वर राहू शकते. यानंतर ऑक्टोबरमध्येही रेपो दरात वाढ होऊ शकते. यामुळे पॉलिसी रेट ५.५ टक्क्यांच्या महामारीपूर्व पातळीच्या वर येऊ शकतो. त्यामुळे सध्या रेपो दर ४.९० टक्क्यांवर पोहोचला आहे. आरबीआयने गेल्या १महिन्यात रेपो दरात दोन वेळा वाढ केली आहे. या महिन्यात चलनविषयक धोरण आढाव्यात रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षातील महागाईचा अंदाज ५.७ टक्क्यांवरून ६.७ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे, जो एसबीआयच्या अहवालात व्यक्त केलेल्या अंदाजाप्रमाणेच आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in