मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या (सीडीओई) पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली आहे. दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रामध्ये होणारे पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम सत्राचे प्रवेश हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने होणार आहेत. या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रीया २२ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.
पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठी एम.ए. इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, संज्ञापन आणि पत्रकारिता, जनसंपर्क; एम. कॉम.(अकाउंट्स), एम. कॉम. (व्यवस्थापन), एम.एस. सी. (गणित), एम. एस. सी. (माहिती तंत्रज्ञान), एम. एस. सी. (संगणकशास्त्र) या अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज https://mucdoeadm.samarth.edu.in या संकेतस्थळावरून भरता येणार आहेत.