कृत्रिम पावसासाठी दोन विदेशी कंपन्यांचा पुढाकार ;चार भारतीयांसह एकूण सहा कंपन्यांचा प्रतिसाद

प्रदूषणमुक्त मुंबईसाठी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी दुबईस्थित कंपनीशी चर्चा करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले.
कृत्रिम पावसासाठी दोन विदेशी कंपन्यांचा पुढाकार ;चार भारतीयांसह एकूण सहा कंपन्यांचा प्रतिसाद
PM

मुंबई : प्रदूषणास कारणीभूत ठरणारे धुळीचे कण हवेत पसरू नयेत, यासाठी मुंबईत कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार आहे. यासाठी अनुभवी कंपन्यांना साद घातली असून दोन विदेशी कंपन्यांसह चार भारतीय कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे.

प्रदूषणमुक्त मुंबईसाठी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी दुबईस्थित कंपनीशी चर्चा करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले. त्यानंतर प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ४ डिसेंबर रोजी जागतिक स्तरावर स्वारस्य अभिरूची मागवण्यात आल्या आहेत. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी आधी चार भारतीय कंपन्यांनी प्रतिसाद दिला. परंतु जागतिक स्तरावर प्रतिसाद न मिळाल्याने स्वारस्य अभिरूची मुदतवाढ देण्यात आली. यादरम्यान, दोन विदेशी कंपन्या इच्छूक असून तसा मेल पालिका प्रशासनाला केल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. दरम्यान, २२ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असून त्यानंतर कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी निर्णय घेण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

तंत्रज्ञान समजून घेणार!

हवेत धुळीचे कण, प्रदूषण थांबून राहत असल्यामुळे कृत्रीम पावसाचा प्रयोगही केला जाणार आहे. यासाठी कंपन्यांकडून त्यांचे तंत्रज्ञान समजावून घेतले जाणार आहे.

यानंतर पात्र ठरणारे तंत्रज्ञान निश्चित झाल्यानंतर मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली जाणार आहेत. यानंतर या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहेत.

यामध्ये ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ १०० पर्यंत असल्यास कृत्रिम पाऊस पाडण्याची गजर पडणार नाही. ‘एक्यूआय’ वाढल्यास कृत्रीम पाऊस पाडला जाईल.

logo
marathi.freepressjournal.in