सहाय्यक लिपिकपदाच्या खुला प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय ;कामगार सेनेने पालिका आयुक्तांचे वेधले लक्ष

या भरतीनंतर जाहिर करण्यात आलेल्या यादीत ४५ टक्के मार्काची अट शिथिल करतेवेळी जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेली सर्व ११७८ पदे भरणे अपेक्षित होते
सहाय्यक लिपिकपदाच्या खुला प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय ;कामगार सेनेने पालिका आयुक्तांचे वेधले लक्ष

मुंबई : मुंबई महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत निम्न संवर्गातून कार्यकारी सहाय्यक  पदाच्या (लिपिक) भरती प्रक्रियेत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय झाल्याचे समोर आले आहे. भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ४५ टक्के मार्काची अट शिथिल करुन उच्चतम गुणवत्तेनुसार प्रसारित करण्यात आलेल्या यादीमध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. कार्यकारी सहाय्यक पदाच्या परीक्षेमधील ४५ टक्के मार्काची अट शिथिल करतेवेळी जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेली सर्व ११७८ पदे भरणे अपेक्षित होते. तसेच पदे भरताना आरक्षणातंर्गत ज्या - ज्या प्रवर्गातील रिक्त पदाप्रमाणे सर्व प्रवर्गातील उमेदवारांना समान न्याय मिळावा, अशी मागणी म्युनिसिपल कामगार कर्मचारी संघटनेने पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. 

मुंबई महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत निम्न संवर्गातून कार्यकारी सहाय्यक पदाच्या (लिपिक) भरती प्रक्रिया पार पडली. या पदासाठी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी प्रसारित करण्यापूर्वी महापालिका आयुक्त यांच्या विशेष अधिकाराचा वापर करुन ४५ टक्क्याची अट शिथिल करणे अत्यावश्यक असल्याची संघटनेची मागणी प्रशासनाने मान्य केली; मात्र यादीमध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

या भरतीनंतर जाहिर करण्यात आलेल्या यादीत ४५ टक्के मार्काची अट शिथिल करतेवेळी जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेली सर्व ११७८ पदे भरणे अपेक्षित होते. तसेच ११७८ पदे भरताना आरक्षणातंर्गत रिक्त पदानुसार सर्व प्रवर्गातील उमेदवारांना समान न्याय मिळावा, अशी संघटनेने यापूर्वी मागणी केली होती. म्युनिसिपल कामगार कर्मचारी संघटनेने पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचे याकडे लक्ष वेधण्यात आले असल्याचे संघटनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी सांगितले. सर्वांना समान न्याय मिळेल याबाबत पत्राद्वारे पालिका आयुक्तांकडे मागणी करण्यात आली असल्याचे कदम यांनी म्हटले आहे.

काय आहेत मागण्या

- आरक्षणातंर्गत ज्या ज्या प्रवर्गातील रिक्त जागा आहेत, त्या प्रवर्गातील उमेदवाराने मिळविलेले गुण ९० पेक्षा जास्त आहेत पण एखाद्या विषयात मार्क कमी असलेल्या उमेदवारांना संधी मिळावी

- खुल्या प्रवर्गातील उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना सामावून घेता येईल त्यासाठी अट शिथिल करावी

 - सद्यस्थितीत कार्यकारी सहाय्यक पदाकरीता ८८२ उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली. यामध्ये गुणवत्तेनुसार ४७६ पदे ही केवळ खुल्या प्रवर्गाची आहे.  इतर प्रवर्गातील उमेदवारांना खुला म्हणून घेण्यात आलेले आहे. ज्या उमेदवारांनी ज्या प्रवर्गात अर्ज केला आहे, त्यांना त्या त्या प्रवर्गात गुणवत्तेप्रमाणे घेण्यात यावे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in