
बेस्ट उपक्रमाने १,४०० सिंगल डेकर बसेस घेण्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी, असे पत्र मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते रविराजा यांनी बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापकांना दिले आहे.
फेब्रुवारी महिन्यात बेस्ट समितीच्या सभेत सदर प्रस्ताव आला होता. त्यावेळी बेस्टने असा निणर्व घेतला होता की, ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या कामा संदर्भात असुरक्षित / असमाधान कारक होत्या, त्यांनी ज्या बसेस पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडला दिल्या होत्या, त्यामध्ये तांत्रिक बिघाड होता. पुणे महानगर परिवहनाने त्याला घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सदर प्रस्ताव रेकॉर्ड करण्यात आला व नवीन निविदा मागविण्याचे ठरविण्यात आले. त्यानंतर ८ जणांनी निविदा पाठविल्या असून ऑलेक्ट्रा, अशोक लेलॅड ( स्विच मोबॅलिटी), पी.एम. आय., चार्टर स्पीड, कॉन्टिनेंटल, सेकस, जी.बी.एम. आणि टाटा यांच्या निविदा आल्या होत्या.
त्यावेळी बेस्ट महाव्यवस्थापकांनी असा निर्णय घेतला की या निविदा बेस्टच्या हिताच्या दृष्टिने नसून त्यामध्ये विसंगती दिसून येत आहे. यामधील चार्टर स्पीड, टाटा, जी.बी.एम., कॉन्टिनेन्टल या ५ जणांची निविदा रद्द केल्या. तर ऑलेक्ट्रा, अशोक लेलॅड, पी.एम. आय. यांच्या निविदा मंजूर केल्या. ५ कंपन्यांच्या निविदा अपात्र ठरलेल्या आहेत. विशेष म्हणजे टाटा कंपनी जगप्रसिद्ध असून गाड्या बनवण्यात प्रसिद्ध आहे. त्यामुळे मंजूर केलेल्या निविदा प्रक्रियेत पारदर्शकता दिसत नाही, त्यामध्ये मोठ्याप्रमाणावर घोटाळा केलेला दिसून येत आहे. तांत्रिक विघाड दाखवून नाकांकित कंपनीचे टेंडर रद्द केले आहे. बेस्ट प्रशानसनाने पारदर्शकता ठेवून बेस्ट उपक्रमाने मंजूर केलेले टेडर रद्द करावे व नवीन टेंडर काढण्यात यावे, अशी मागणी रवी राजा यांनी पत्राद्वारे महाव्यवस्थापकांना केली आहे.