बोरिवली टेकडी जलाशयाची तपासणी, ९ जानेवारीला कमी दाबाने पाणीपुरवठा.

नागरिकांनी पाणी जपून वापरावे,दोन दिवस पाणी गढूळ येण्याची शक्यता- जल विभागाचे आवाहन
बोरिवली टेकडी जलाशयाची तपासणी, ९ जानेवारीला कमी दाबाने पाणीपुरवठा.

मुंबई : बोरिवली (पूर्व) येथील संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य येथील बोरिवली टेकडी जलाशय क्रमांक ०२ ची संरचनात्मक तपासणी केली जाणार आहे. हे काम येत्या मंगळवार, ९ जानेवारी रोजी दुपारी १ ते रात्री ९ वाजेपर्यंत (एकूण आठ तास) होणार आहे. या कामादरम्यान, बोरिवली टेकडी जलाशय क्रमांक २ रिक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे आर मध्य विभागातील पाणीपुरठ्यावर या दिवशी परिणाम होणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे, तसेच पुढील दोन दिवस पाणी गढूळ येण्याची शक्यता असल्याने पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन पालिकेच्या जल विभागाने केले आहे.

बोरिवली टेकडी जलाशयाची तपासणी केली जाणार आहे. जलाशयाच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे काम येत्या ९ जानेवारीला हाती घेतले जाणार आहे. जवळपास आठ तासांचा कालावधी लागणार आहे. या दरम्यान जलाशय क्रमांक २ रिकामे केले जाणार आहे. त्यामुळे या विभागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाईल. नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा व यादिवशी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

दोन दिवस पाणी गाळून, उकळून प्यावे

जलाशयाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील दोन दिवस पाणी गढूळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, असे पालिकेकडून आवाहन करण्यात आले आहे.

या’ भागात कमी दाबाने पाणीपुरवठा

-कांदिवली -

महिंद्रा आणि महिंद्रा, गुंदेचा ठाकूर गांव व समता नगर- सरोवा संकुल, कांदिवली (पूर्व)

-बोरिवली -

ला-बेल्लेजा व ला-वेस्टा, बोरिवली (पूर्व)

-दहिसर -

शिव वल्लभ मार्ग (उत्तर बाजू), मारुती नगर, रावळपाडा, एन. जी. उद्यान, रिव्हर उद्यान, गावडे नगर, भोईर नगर, मिनी नगर, एस. एन. दुबे मार्ग, संत कबीर मार्ग, ज्ञानेश्वर नगर, कोकणीपाडा, संत नामदेव मार्ग, वाघदेवी नगर, केशव नगर, राधाकृष्ण नगर, धारखाडी, सुहासिनी पावसकर मार्ग, मेंदोडा कुंपण, भोईर कुंपण, सिद्धनाथ मिश्रा कुंपण, संत मीराबाई मार्ग, राज नगर, सुयोग नगर, वैशाली नगर, नरेंद्र संकुल, केतकीपाडा, एकता नगर, दहिसर टेलिफोन एक्स्चेंज, घरटनपाडा क्रमांक १ व २, गणेश मंदिर मार्ग, अष्टविनायक चाळ, दहिसर (पूर्व, आनंद नगर, आशिष संकुल, एन. एल. संकुल, वीर संभाजी नगर, भाबलीपाडा, पराग नगर, लिंक मार्ग, गोवण मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज संकुल, सुधींद्र नगर, देवयानी संकुल, महालक्ष्मी आणि सरस्वती संकुल, शक्ती नगर, सद्गुरू छाया लेऊट बंगाली पाडा, महाकाली वाडी, मातृछाया गल्ली, दहिसर भुयारी मार्ग, आनंद नगर (अंशत:), तरे कुंपण, अवधूत नगर, वर्धमान औद्योगिक परिसर, सी. एस. मार्ग, दहिसर पोलीस स्थानक परिसर, किसान नगर, वर्धमान औद्यगिक परिसर, डायमंड इंडस्ट्री, नॅशनल मील कुंपण, रामाणी कुंपण, केतकीपाडा ऑनलाईन पंपिंग, दहिसर (पूर्व)

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in