राज्यभरात श्रींची जल्लोषात प्रतिष्ठापना

निर्बंध शिथिल केल्यामुळे बाप्पाला घेऊन येणाऱ्या नागरिकांमध्ये जल्लोष असल्याचे चित्र राज्यभर दिसत आहे.
राज्यभरात श्रींची जल्लोषात प्रतिष्ठापना

महाराष्ट्रात अगदी धुमधडाक्यात साजरा होणारा सण म्हणजे गणेशोत्सव. या सणामुळे संपूर्ण राज्यात एक वेगळाच उत्साह संचारतो. कोरोना काळातल्या निर्बंधानंतर बुधवारी दोन वर्षांनी राज्यभरात गणरायाचे वाजत गाजत आगमन झाले. राज्य शासनाने गणेशोत्सवासाठीचे अनेक निर्बंध शिथिल केल्यामुळे बाप्पाला घेऊन येणाऱ्या नागरिकांमध्ये जल्लोष असल्याचे चित्र राज्यभर दिसत आहे. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच मिरवणुका आणि विसर्जनादरम्यान नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी स्थानिक प्रशासनासह पोलिसांनी चूक व्यवस्था केली आहे.

राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या ‘जलभूषण’ या राजभवनातल्या निवासस्थानातही गणेश चतुर्थी निमित्त गणेशाची प्रतिष्ठापना केली गेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी सकाळी गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मुंबई सह संपूर्ण कोकणातही बुधवारी गणरायाचे जल्लोष स्वागत झाले. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी आपापल्या गावी आले आहेत. नागरिक पारंपारिक पद्धतीने नुसार समूहाने गणरायाला वाजत गाजत आपापल्या घरी घेऊन जात असल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि मुंबईत घरगुती तसेच सार्वजनिक उत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे ढोल ताशाच्या गजरात मिरवणुकांसह स्वागत केले जात असल्याचे चित्र ठिकठिकाणी पाहायला मिळाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in