दगडफेकप्रकरणी आज अहवाल सादर करण्याचे निर्देश; पवई जय भीम नगर येथील घटना

पवई जय भीम नगर येथील बेकायदा बांधकामावर कारवाईसाठी गेलेल्या पालिका अधिकारी व पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती.
दगडफेकप्रकरणी आज अहवाल सादर करण्याचे निर्देश; पवई जय भीम नगर येथील घटना
Published on

मुंबई : पवई जय भीम नगर येथील बेकायदा बांधकामावर कारवाईसाठी गेलेल्या पालिका अधिकारी व पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती. या दगडफेकीत १० पोलिसांसह पालिका १० मजदूर आणि कर्मचारी जखमी झाले होते. या घटनेवरून आरोप प्रत्यारोप झाले. परंतु नेमकी घटना कशी घडली, याचा सविस्तर रिपोर्ट सादर करावा, अशी मागणी काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभेत लावून धरली होती. अखेर विधानसभा अध्यक्षांनी शुक्रवारी रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश दिले.

पवई गाव व मौजे तिरंदाज गाव येथील भूखंडावर सुमारे ५०० हून अधिक अनधिकृत झोपड्या वसल्या आहेत. झोपड्या हटवण्याबाबत पालिकेने नोटीस बजावली होती. मात्र नोटिशीकडे दुर्लक्ष केल्याने ६ जून रोजी पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथक पोलीस बंदोबस्तात निष्कासनाची कारवाईसाठी गेले. यावेळी झोपडपट्टीतील नागरिकांनी पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी व पोलिसांवर दगडफेक केली. यात पालिकेचे ५ अभियंता, ५ मजदूर व १५ पोलीस जखमी झाले आहेत. या घटनेनंतर आरोप प्रत्यारोप झाले.

दस्तुरखुद्द पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी घटनास्थळी भेट देत बेकायदा बांधकामाविरोधात कारवाई सुरूच राहणार, असा इशारा दिला होता. मात्र एवढी मोठी घटना घडते दगडफेक होते, पोलीस अधिकारी पालिका अधिकारी जखमी होतात, हे गंभीर प्रकरण आहे. त्यामुळे ही घटना नेमकी कशामुळे घडली, घटनेमागे सूत्रधार कोण, चौकशीअंती काय कारवाई, याचा सविस्तर रिपोर्ट पटलावर ठेवण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लावून धरली होती. त्यानंतर रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिले होते. मात्र आजपर्यंत रिपोर्ट सादर करण्यात आलेला नाही.

विधानसभा अध्यक्षांनी निर्देश देऊनही रिपोर्ट सादर न करणे ही गंभीर बाब आहे, असे सांगत कोण अधिकारी रिपोर्ट देत नाही, असा प्रश्न नाना पटोले यांनी गुरुवारी विधानसभेत उपस्थित केला. पटोले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तर देत

शुक्रवारी रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.

logo
marathi.freepressjournal.in