मुंबई : मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकाऱ्यांच्या शनिवारी अंतर्गत बदल्या करण्यात आल्या असून त्यात दोन अधिकाऱ्यांना एसीपी तर तीन पोलीस अधिकाऱ्यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण एकनाथ कर्पे यांची विशेष शाखेतून गावदेवी विभागात बदली झाली आहे. अशोक संपतराव ठुबे आणि राजेश कल्याणा बाबशेट्टी यांना सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती देऊन त्यांची अनुक्रमे ठाण्यातून पूर्व नियंत्रण कक्ष आणि विशेष शाखा एक येथे बदली करण्यात आली आहे.
तसेच पंधरा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात विशेष शाखेचे अविनाश विठ्ठल पवार यांची दहिसर पोलीस ठाणे, सागरी-एक पोलीस ठाण्याचे रोहित चंद्रकांत खोत यांची शिवडी, शसस्त्र पोलीस दलाचे मदन विष्णू पाटील यांची नवघर, वाहतूक विभागाचे धनंजय पंढरीनाथ सोनावणे यांची सहार, विशेष शाखेचे राजेश रुद्रमणी नंदीमठ यांची कस्तुरबा मार्ग, सहार पोलीस ठाण्याचे संजय यशवंत गोविलकर यांची वाहतूक विभाग, कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याचे अनिल रामचंद्र आव्हाड यांची सशस्त्र पोलीस नायगाव, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अर्जुन रामकृष्ण रजाने यांची संरक्षण व सुरक्षा, मेघवाडी पोलीस ठाण्याचे अजय क्षीरसागर यांची सशस्त्र पोलीस मरोळ, आर्थिक गुन्हे शाखेचे दत्ताराम विश्वास चव्हाण यांची पश्चिम सायबर पोलीस ठाणे, अलिबागचे अनिल गंगाधरराव टोम्पे यांची मुख्य नियंत्रण कक्ष, अंधेरी सोपान तर नवी मुंबईखे बापूराव मधुकर देशमुख यांची शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बदली दाखविण्यात आली आहे.
अन्य तीन पोलीस निरीक्षकांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बढती देऊन त्यांची बदली करणयात आली आहे. त्यात अंधेरी पोलीस ठाण्याचे उमेश सोपान मच्छिंदर यांची मेघवाडी पोलीस ठाणे, धारावीच्या नम्रता निलेश लोखंडे यांची सागरी-एक पोलीस ठाणे, टिळकनगर पोलीस ठाण्याचे राजेश रामचंद्र शिंदे यांची ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
अन्य सहाय्यक पोलीस निरीक्षकांमघ्ये शशिकांत गिरी यांची मरिनड्राईव्ह, गणेश इंगळे यांची संरक्षण व सुरक्षा, विराज गिरे यांची सशस्त्र पोलीस दल, योगेश देशमुख, मोरशरील पटेल यांची आर्थिक गुन्हे शाखा, भारत साळुंखे यांची वाहतूक विभाग, पल्लवी जगदाळे यांची विशेष शाखा दोन, आणि अनिल बागुल यांची सशस्त्र पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संतोष कदम, एपीआय भारत माने, आनंद बागडे, सुहास माने, संदीप पिसे यांची आर्थिक गुन्हे शाखा, एपीआय रोहित नार्वेकर, अमोल गवळी, प्रकाश सावंत, दिनेश शेलार, पोलीस उपनिरीक्षक श्यामसुंदर भिसे, शितल पाटील, विकास मोरे, सागर घाडगे, इंद्रजीत शिरसाठ, निखिल शेळके, बाळासाहेब शिंदे, सुजीत म्हैधुणे, अमोल कांबळे, अमीत घोगरे, दत्तात्रय अलगुर यांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे.