'स्त्रीत्व' एक्रिलिक रंग चित्रांचे एकल चित्रप्रदर्शन आविष्कार

१२ ते १८ डिसेंबर या कालावधीत हे प्रदर्शन रसिकांना रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य पाहता येणार
'स्त्रीत्व' एक्रिलिक रंग चित्रांचे एकल चित्रप्रदर्शन आविष्कार

चित्रकार शीतल यांच्या कॅनव्हासवर काढलेल्या एक्रिलिक रंग चित्रांचे एकल चित्रप्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी येथे सुरु होणार आहे. १२ ते १८ डिसेंबर या कालावधीत हे प्रदर्शन रसिकांना रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य पाहता येणार आहे. या प्रदर्शनात शीतल यांनी ठेवलेली कलात्मक चित्रे स्त्रीत्वाचे अनेक नाविन्यपूर्ण व वास्तववादी पैलू एका अनोख्या शैलीद्वारे दर्शवितात.

प्रस्तुत प्रदर्शनात चित्रकार शीतल यांनी अतिशय कलात्मक रंगयोजना, संकल्पना व विविध मनोभावना यांनी नटलेली कलारूपे सादर केली आहेत. विविध स्त्री रूपे आपल्या चित्र माध्यमातून साकारताना त्यांनी त्यात स्त्री मनातील सुलभ भावना, संकल्पना, जाणीव आणि अनुभव ह्यांचा कलात्मक समावेश आपल्या चित्रसंपदेत केला आहे. कधी शारदा, कधी लक्ष्मी, कधी माता, कधी शक्ती, कधी संगीता, कधी अभिसारिका, कधी निर्मिती, तर कधी निर्माणकर्ती वगैरे भूमिकातून साकारलेले स्त्रीरूपाचें भावनिक पैलू साकारताना त्यांनी कलात्मकता, निरामयता व निरागसता तसेच रम्यता ह्यांचे एक सौंदर्यपूर्ण दर्शन सर्वांना घडविले आहे. बालपणापासून स्त्री वर होणारे संस्कार, सामाजिक बंधने, आचरण व तिच्या वर्तनासंबंधी अनेक प्रचलित सामाजिक रूढी, परंपरा व प्रथा ह्यांचा कलात्मक व दर्जेदार समन्वय साधून तिने आपल्या चित्रांमध्ये वास्तविकता व रमणीयता याचा एक बोलका अविष्कार सादर केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in