खासगी संस्थेने दत्तक घेतलेल्या १२ उद्यानांची चौकशी सुरु

या खासगी संस्थेला प्रति उद्यान एक रुपया, अशा वार्षिक भाडेतत्त्वावर १२ उद्याने देण्यात आली होती
खासगी संस्थेने दत्तक घेतलेल्या १२ उद्यानांची चौकशी सुरु

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दत्तक योजनेंतर्गत उद्यान विकसित व देखभालीसाठी खासगी संस्थेने दत्तक घेतलेल्या १२ उद्यानांच्या गैरवापराच्या तक्रारीची चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबई हायकोर्टात दिली.

वर्ल्ड रिन्युअल स्पिरीच्युअल ट्रस्ट(ब्रह्मा) या खासगी संस्थेला प्रति उद्यान एक रुपया, अशा वार्षिक भाडेतत्त्वावर १२ उद्याने देण्यात आली होती. पहिला भडेतत्त्वाचा करार १९९४ ते २००२ या कालावधीत संपुष्टात आला असूनही या जमिनींचा बेकायदेशीर ताबा संस्थेकडेच आहे. या संस्थेने उद्यांनांचा गैरवापर केल्याने पालिकेने संस्थेकडून कराराच्या तारखेपासून उद्याने रिकामी होईपर्यंत शुल्क अथवा दंड आकारावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका निवृत्त लष्करी अधिकारी कॅप्टन हरेश गगलानी यांनी केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायामूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाकडे सुनावणी झाली

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in