पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी स्वप्ना पाटकर यांची ‘ईडी’कडून चौकशी

१ ऑगस्ट रोजी ‘ईडी’ने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अटक केली होती.
पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी स्वप्ना पाटकर यांची ‘ईडी’कडून चौकशी

पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी स्वप्ना पाटकर यांची मंगळवारी ‘ईडी’ने चौकशी केली. दुपारी ३.३० वाजता पाटकर या ‘ईडी’च्या कार्यालयात दाखल झाल्या. तेथे सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. यापूर्वीही पाटकर यांची चौकशी ‘ईडी’ने केली आहे.

१ ऑगस्ट रोजी ‘ईडी’ने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अटक केली होती. राऊत यांना ५ सप्टेंबर रोजी न्यायालयीन कोठडी दिली आहे. राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचीही ‘ईडी’ने जबाब नोंदवला आहे.

राऊत यांची न्यायालयीन कोठडी २२ ऑगस्ट रोजी संपली. सोमवारी विशेष पीएमएलए न्यायालयाने त्यांच्या कोठडीत वाढ केली.

१,०३४ कोटी रुपयांच्या पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ‘ईडी’ने अनेक वेळा त्यांना समन्स पाठवले आहे. यंदाच्या फेब्रुवारीत ईडीने प्रवीण राऊत यांना पीएमएलए गैरव्यवहारप्रकरणी अटक केली होती. प्रवीण राऊत हा गुरुआशिष कन्स्ट्रक्शनचा माजी संचालक आहे. पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणात गुरुआशिष कन्स्ट्रक्शन सहभागी होते. ४७ एकर पसरलेल्या पत्राचाळीत ६७२ भाडेकरू होते. ही जागा म्हाडाची होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in