
मुंबई : मध्य पूर्वेत सध्या सुरू असलेल्या तणावामुळे गुंतवणूकदारांवरील दबावामुळे भारतीय शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी बुधवारी पाच शतकी घसरण झाली. मुंबई शेअर बाजारातील पाच सत्रातील घसरणीत गुंतवणूकदारांचे १४.६० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पाच दिवसांत बीएसई सेन्सेक्स २,३७९.०३ अंकांनी म्हणजेच ३.५८ टक्क्यांनी घसरला आहे. बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल पाच दिवसांत १४,६०,२८८.८२ कोटी रुपयांनी घसरून ३,०९,२२,१३६.३१ कोटी रुपये झाले. सलग पाचव्या दिवशी बुधवारी सेन्सेक्स ५२२.८२ अंकांनी म्हणजेच ०.८१ टक्क्यानी घसरून ६४,०४९.०६ वर बंद झाला. दिवसभरात तो ६४ हजारांखाली गेला. अशाच प्रकारे एनएसई निफ्टी १५९.६० अंकांनी किंवा ०.८३ टक्क्यानी घसरून १९,१२२.१५ वर बंद झाला.