आयपीएलसाठी बेस्टच्या ५०० बसेसचे बुकिंग; एका बसचे भाडे १२ ते १६ हजार रुपये

‘एज्युकेशन अँड स्पोर्ट्स ऑफ ऑल’ अंतर्गत मुंबईचा एक सामना हा शाळकरी मुलांसाठी राखीव असतो. बच्चे कंपनीलाही हा थरार अनुभवता यावा, यासाठी ‘एज्युकेशन अँड स्पोर्ट्स ऑफ ऑल’ या संस्थेच्या वतीने या बसचे बुकिंग करण्यात आले आहे.
आयपीएलसाठी बेस्टच्या ५०० बसेसचे बुकिंग; एका बसचे भाडे १२ ते १६ हजार रुपये
Published on

मुंबई : सध्या आयपीएलचा हंगाम सुरू असून सगळेच आयपीएल क्रिकेट सामन्याचा आनंद लुटतात. परंतु बच्चे कंपनीला प्रत्यक्ष स्टेडियमवर लाईव्ह आयपीएल क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळणार आहे. रविवार ७ एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल सामन्यांचा आनंद लहान मुलांना लुटता यावा, यासाठी मुंबई इंडियन्स फ्रँचायझीच्या ‘एज्युकेशन अँड स्पोर्ट्स ऑफ ऑल’ या संस्थेने तब्बल ५०० एसी व नॉन एसी बसेस बूक केल्या आहेत.

‘एज्युकेशन अँड स्पोर्ट्स ऑफ ऑल’ अंतर्गत मुंबईचा एक सामना हा शाळकरी मुलांसाठी राखीव असतो. बच्चे कंपनीलाही हा थरार अनुभवता यावा, यासाठी ‘एज्युकेशन अँड स्पोर्ट्स ऑफ ऑल’ या संस्थेच्या वतीने या बसचे बुकिंग करण्यात आले आहे. यामध्ये एका बसचे भाडे १२ ते १६ हजार रुपये इतके आहे. यामुळे बच्चेकंपनीला प्रत्यक्ष स्टेडियमवरून लाईव्ह आयपीएल क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळणार आहे. यासाठी ५०० एसी व नॉन एसी बसेस बुक केल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले. यामुळे बेस्टला चांगलाच महसूल मिळणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in