बेजबाबदार चालकांना पुन्हा दणका;नो पार्किंगमधील वाहनांवर कारवाई होणार

नागरिकांचा प्रतिसाद पाहून प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात आलेला हा निर्णय नियमित करण्याबाबतही पांडेंनी म्हटले होते.
बेजबाबदार चालकांना पुन्हा दणका;नो पार्किंगमधील वाहनांवर कारवाई होणार

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी नो पार्किंग आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या गाड्या टोईंग न करण्याचा निर्णय ५ मार्चला घेतला होता. संजय पांडे निवृत्त झाल्यानंतर आणि सत्तांतरानंतर मुंबईतील टोईंगबाबतचा हा निर्णय बदलण्यात आला आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना यापुढे खबरदारी घ्यावी लागणार आहे. नागरिकांचा प्रतिसाद पाहून प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात आलेला हा निर्णय नियमित करण्याबाबतही पांडेंनी म्हटले होते. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला होता; मात्र आता हा निर्णय बदलल्याने मुंबईकरांना मोठा झटका बसला आहे.

मुंबईकरांना कायमच वाहतूककोंडीशी सामना करावा लागतो. पांडेंनी घेतलेल्या निर्णयानंतर अनेक वाहनचालक कसेही वाहने पार्क करत होते. आयुक्तांनी दिलेल्या मुभेचा काही जणांकडून गैरफायदा घेतला जात होता. बेजबाबदारपणे रस्त्याच्या मध्ये कशीही गाडी पार्क केल्याने वाहतूककोंडी होत होती.

त्यामुळे माजी पोलीस आयुक्तांचा निर्णय बदलण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता आम्ही पार्किंग कुठे करायचे, असा प्रश्न वाहनचालकांनी उपस्थित केला आहे. या निर्णयामुळे काही प्रमाणात गैरसोय होईल; मात्र बेजबाबदारपणे पार्किंग करणाऱ्यांना या निर्णयामुळे धडा मिळेल, असे बोलले जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in