Isha Ambani blessed with twins : अब्जाधीश मुकेश अंबानींच्या घरी गोड बातमी; ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांना जुळी अपत्यप्राप्ती

ईशा अंबानीचे (Isha Ambani) लग्न ४ वर्षांपूर्वी उद्योगपती आनंद पिरामल यांच्याशी झाले होते. ईशा अंबानी सध्या रिलायन्स रिटेलचा व्यवसाय सांभाळते.
Isha Ambani blessed with twins : अब्जाधीश मुकेश अंबानींच्या घरी गोड बातमी; ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांना जुळी अपत्यप्राप्ती

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची मुलगी ईशा अंबानी (Isha Ambani) आणि पती आनंद पिरामल यांना जुळी मुले झाल्याची गोड बातमी समोर आली. माध्यमांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हंटले आहे की, "आम्हाला हे सांगताना आनंद होत आहे की, आमची मुले ईशा आणि आनंद यांना १९ नोव्हेंबर २०२२ रोजी सर्वशक्तिमानाने जुळ्या मुलांचा आशीर्वाद दिला आहे," यापैकी मुलीचे नाव आदिया, तर मुलाचे नाव कृष्णा ठेवण्यात आले आहे.

ईशा अंबानीचे लग्न ४ वर्षांपूर्वी उद्योगपती आनंद पिरामल यांच्याशी झाले होते. ईशा अंबानी सध्या रिलायन्स रिटेलचा व्यवसाय सांभाळते. ती कंपनीच्या रिटेल बिझनेसची चेअरमनही आहे. आनंद पिरामल एक उद्योगपती आहेत. ते पिरामल एंटरप्रायझेसचे मालक अजय पिरामल व स्वाती पिरामल यांचे सुपुत्र आहेत. मुकेश अंबानींच्या कुटुंबात आता ३ छोटी मुले झाली आहेत. त्यांचा मुलगा-सून आकाश व श्लोकाला एक मुलगा आहे. त्याचे नाव पृथ्वी आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in