मुंबई : गुंतवणुकीच्या आमिषाने एका आयटी इंजिनिअर महिलेची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार मालाड परिसरात घडला. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. बंगळुरू अॅमेझॉन प्राव्हेट लिमिटेडमध्ये आयटी इंजिनिअर म्हणून काम करणारी तक्रारदार २९ वर्षांची महिला मालाड मध्ये राहत असून, तिला बीट कॉईनमध्ये गुंतवणूक करायची होती. याबाबत सोशल मिडीयावर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करताना तिला तिच्या मैत्रिणीने बीट कॉईन गुंतवणुकीवर तिला चांगला परतावा मिळाल्याचे सांगितले. त्यामुळे तिने तिच्या सांगण्यावरुन बीट कॉईनसाठी गुंतवणूक केली होती. यावेळी तिला समोरील व्यक्तीने त्यांच्या कंपनीत बीट कॉईनच्या गुंतवणुकीवर कमी वेळेत जास्त परवाता मिळत असल्याचे सांगितले होते. काही दिवसांनी तिला तिच्या गुंतवणुकीवर चांगला परवाता मिळत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे तिचा संबंधित कंपनीत विश्वास बसला होता. जास्त पैसे मिळत असल्याने तिने आणखीन रक्कम बीट कॉईनमध्ये गुंतवणूक केली होती.