अभिनेत्रीचे आठ लाखांचे महागडे घड्याळ चोरीला

अभिनेत्रीला वाढदिवसानिमित्त तिच्याच एका मित्राने आठ लाख रुपयांचे रोलेक्स कंपनीचे घड्याळ गिफ्ट दिले होते. संगीता तिच्याकडे मोलकरीण म्हणून कामाला आहे. २७ फेब्रुवारीला मिटिंगसाठी हे घड्याळ घातल्यानंतर तिने ते कपाटात ठेवले होते.
अभिनेत्रीचे आठ लाखांचे महागडे घड्याळ चोरीला

मुंबई : गोरेगाव येथे राहणाऱ्या अभिनेत्रीचे सुमारे आठ लाखांचे महागडे घड्याळ तिच्याच मोलकरणीने चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संगीता बर्मन या २६ वर्षांच्या मोलकरणीविरुद्ध गोरेगाव पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. संगीता ही मध्यप्रदेशची रहिवाशी असून चोरीनंतर ती तिच्या गावी पळून गेल्याचा पोलिसांना संशय आहे.

अभिनेत्रीला वाढदिवसानिमित्त तिच्याच एका मित्राने आठ लाख रुपयांचे रोलेक्स कंपनीचे घड्याळ गिफ्ट दिले होते. संगीता तिच्याकडे मोलकरीण म्हणून कामाला आहे. २७ फेब्रुवारीला मिटिंगसाठी हे घड्याळ घातल्यानंतर तिने ते कपाटात ठेवले होते. १४ मार्च रोजी संगीता आई आजारी असल्याचे सांगून गावी गेली होती. ९ एप्रिलला एका कार्यक्रमासाठी जाण्याकरिता कपाटातून घड्याळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथे ते घड्याळ नव्हते. तिने सर्वत्र शोध घेतला, मात्र तिला कुठेच घड्याळ सापडले नाही. संगीतानेच हे घड्याळ चोरले असावे, असा अंदाज व्यक्त करून तिने गोरेगाव पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी संगीताविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवून तिचा शोध सुरु केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in