
देशाच्या विविध भागातून पाऊस परतला असला तरी अजूनही महाराष्ट्रासह काही राज्यातून हा परतीचा गेलेला नाही. त्यामुळे पुढील दोन दिवस पाऊस बरसणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.
मागील आठवड्यापासून पावसाने काहीशी उसंत घेतलेली असली तरी उष्णतेत वाढ झाली. त्यातच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. त्यामुळे मुंबईसह राज्यात पुन्हा हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. मेघगर्जनेसह मुंबई व उपनगरातील काही भागांत पुढील दोन दिवस राज्यात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जयंता सरकार यांनी वर्तविली आहे. तर त्यानंतर दोन ते तीन दिवस काहीसा जोर अधिक राहील अशी शक्यता त्यांनी वर्तविली आहे. मात्र हा परतीचा पाऊस असून राज्यातून देखील परतीच्या मार्गावर असल्याचे त्यांनी सांगितले.
देशातील अनेक भागात परतीच्या पावसाची चाहूल लागली असली तरी परतीच्या पावसाची पुरेशी आगेकूच झालेली दिसत नाही. तर काही भागातून हा पाउस गेलेला असला काही भागात अजूनही परतीचा पाउस हजेरी लावत आहे. मात्र चार ते पाच दिवसात उरलेल्या भागातून देखील हा पाउस जाणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे पुढील ०२ त्यानंतर पुढील ०२ दिवस मेघागर्जेनेसह पाऊस बरसेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.