जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांचा ‘कोविड योद्धा’ म्हणून सन्मान

जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांचा ‘कोविड योद्धा’ म्हणून सन्मान

यू. एस. इंडिया इम्पोर्ट्स कौन्सिलच्या वर्धापनदिनानिमित्त जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांचा ‘कोविड योद्धा’ म्हणून सन्मान करण्यात आला. कोरोना काळामध्ये डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. डॉ. सापळे यांनी जे. जे. रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांसाठी तातडीने उपाययोजना करण्यासह राज्याच्या ग्रामीण भागामध्ये पदभार मिळालेल्या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी केली. कोरोना संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी उत्तम नियोजन केले. सर ज. जी. रुग्णालय, सेंट जॉर्जेस रुग्णालय, गो. ते. रुग्णालय, कामा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सांगली यांसह अशा विविध संस्थांमध्ये पथकप्रमुख म्हणून काम केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in